आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्याची औरंगाबादमध्ये 12 एप्रिलला होणारी मराठवाडा आढावा बैठक रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात राबविण्यात येत असलेल्या विवीध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 12 एप्रिलला बैठक घेण्यात येणार होती. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली होती. मात्र, आज (सोमवारी) दुपारी ही बैठक रद्द झाल्याचे कळवण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्र विभागीय आयुक्त  कार्यालयाला प्राप्त झाले आहे. यामध्ये आगामी काळात याबाबतची तारिख कळवून ही बैठक घेण्यात येणार आहे.

यापूर्वी सप्टेबर महिन्यात ही बैठक घेण्यात येणार होती. मात्र नगरपालिका निवडणुकांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर 12 मार्च ही तारिख ठरवण्यात आली होती. त्याबाबतचे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयांना आले होते.   या बैठकीसाठी सर्व जिल्हाचे पालकमंत्री उपस्थित राहणार होते. तसेच मराठवाडयाचे सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह तब्बल 400 पेक्षा जास्त अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठीची तयारी करण्यात आली होती. यामध्ये जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत मिशन, कृषी पंप जोडणी, संगणकृीय सातबारा, 2017 खरिप हंगाम आढावा, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येणार होता. यापूर्वी नाशिक कोकण विभागाचा प्रादेशीक बैठक घेण्यात आल्या आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...