आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मुलासाठी गायल्या मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व वरिष्ठ बॅंक अधिकारी अमृता फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत भक्तिगीताचे रेकॉर्डिंग केले. डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित हाेणाऱ्या मराठी चित्रपटात हे गाणे एेकायला मिळेल.

रामनगर कारखान्याजवळील डांबरी गावचा कैलास पवार हा तरुण दत्तात्रयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रावर चित्रपट काढत अाहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत दत्तात्रयांची विविध स्थाने पिंजून काढत त्याने या स्थळांचे शूटिंगही केले अाहे. या चित्रपटात पैठणमधील ऋषिकेश माेेरे हा श्रीपादांची भूमिका करत अाहे. या चित्रपटातील एखादे तरी गीत अमृता फडणवीस यांनी गायला हवे, अशी कैलासची इच्छा हाेती. यासाठी त्याने अमृता यांच्याकडे हट्टही धरला. या हाेतकरू तरुणाची धडपड पाहून अमृता यांनी त्यास हाेकार दर्शवला. गुरुवारी अमृता यांनी चित्रपटासाठी गीत गायन केले. मुंबईतील यशराज स्टुडिअाेत ‘श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मीनरसिंह राजा...’ या गीताचे रेकाॅर्डिंग करण्यात अाले. या गीताचे गीतकार रंगनाथ सोनटक्के असून आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे.
बातम्या आणखी आहेत...