आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीएनजी’मुळे दररोज दोन लाख लिटर पेट्रोलची बचत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील इंधन बचत आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वर चालणार्‍या गाड्या उत्तम पर्याय ठरू शकतो. शहरातील सुमारे 25 हजार रिक्षाचालक या सुविधेसाठी इच्छुक आहेत. यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे. पुणे, मुंबई या शहरांत चालणार्‍या टॅक्सी आणि रिक्षा सीएनजीवर चालत असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर इंधनाची बचत होते. शहरातील 25 हजार रिक्षांना हा नवीन पर्याय मिळाल्यास दररोज 2 लाख लिटर पेट्रोलची बचत होऊ शकते.

शहरात 2 लाख लिटर पेट्रोलची आवश्यकता असते. 60 विविध कंपन्यांच्या पेट्रोल पंपांमार्फत पुरवठा केला जातो. 25 हजार रिक्षांना रोज सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक पेट्रोल लागते. इंधन महाग असल्यामुळे परिणामी रिक्षांचे भाडेही मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. ‘भाडे वाढवा’ हा रिक्षाचालकांचा रेटा कायम सुरूच असतो. याला सीएनजी पर्याय ठरू शकतो.

काय आहे सध्याची परिस्थिती ?
शहरात सुमारे 300 रिक्षा एलपीजीवर चालतात. ऑइलसह रिक्षाचालकाला पेट्रोलसाठी 100 रुपये खर्च येतो. एक रिक्षा रोज 16 तास चालते. यासाठी 8 लिटर पेट्रोल लागते. वाळूज, चिकलठाणा आणि सुंदरवाडी येथे एलपीजीची सुविधा आहे. हे पंप शहराबाहेर असल्याने रिक्षाचालक आणि इतर वाहनधारकांना रोज त्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. पानेवाडी आणि पुण्यापर्यंत सीएनजी सुविधा आहे. ती पाइपलाइनद्वारे औरंगाबादपर्यंत आणणे शक्य आहे.

गॅस पंपासाठी आवश्यक नियम
> पंपाची जागा ही 20 हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त हवी.
> पंपावर अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा असावी.
> केंद्रीय स्फोटके प्राधिकरणाकडून मिळणारे परवाना या पंपासाठी आवश्यक आहे.
> घनदाट लोकवस्तीच्या भागात गॅस पंप देण्याचे टाळले जाते.

शहरातील 17 हजार 500 परवानाधारक रिक्षाचालक सीएनजी वापर करण्यास तयार आहेत. शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा. निसार अहमद, सचिव, रिक्षाचालक संघर्ष कृती समिती

सीएनजीची मागणी वाढल्यास कंपनी त्याचा सकारात्मक विचार करू शकेल. फायर सेफ्टीचे नियम पाळून ते शक्य आहे. प्रशांत परमार, वरिष्ठ व्यवस्थापक, हिंदुस्तान पेट्रोलियम

मनपाने परवानगी दिल्यास शहरात 15 ठिकाणी एलपीजीची सुविधा देता येईल. सीएनजीचा पुरवठा करणे शक्य होईल. अखिल अब्बास, सचिव, पेट्रोल डिलर्स असोसिएशन

काय होईल फायदा?
1. सीएनजी गॅस 35 ते 40 रुपये प्रतिकिलो मिळतो. पेट्रोलपेक्षा 5 किलोमीटर अधिक अँव्हरेज देतो.
2. नवीन गाड्यांमध्ये ही सुविधा आहे. जुन्या गाडीत सीएनजी किंवा एलपीजी किट बसवण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येतो.
3. एलपीजी सध्या 45 रुपये प्रतिकिलो मिळतो.