आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत चोरपावलांनी थंडीचे आगमन; पारा चार अंशांनी घसरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या चार दिवसांपासून हवामानात बदल झाला असून गारव्यात वाढ होत आहे. पुढील चार दिवस असेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला.

उत्तरा नक्षत्रातील 11 दिवसांत 208 मि.मी. पाऊस झाला. मागील पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असली तरी जमिनीतील ओलावा कायम आहे. दिवसभर आकाशात दाट ढगांचे आच्छादन राहत असल्यामुळे सूर्यदर्शन दुर्लभ झाले. ताशी 10 ते 15 कि.मी. वेगाने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानातही 4.2 अंशांनी घसरण झाली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरीही कोसळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा जाणवत आहे. 20 सप्टेंबरला 32.0 अंशांवर असलेला पारा हवामानात बदल झाल्याने गेल्या चार दिवसांपासून 27.8 अंशांपर्यंत खाली घसरला.

तापमानातील चढ-उतार
19: 31.0 00
20: 32.0 1.0+
21: 27.1 4.9-
22: 27.2 0.1+
23: 27.8 0.6+
24: 27.8 स्थिर

आठवडाभरात परतीचा पाऊस
महाराष्ट्रातील मान्सून दक्षिण, मध्य प्रदेश आणि गुजरातकडे वळला आहे. तिकडून आपल्याकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात घसरण झाली. तीन ते चार दिवस असेच वातावरण राहील. हलक्या सरीही पडतील.
-पी. एस. साळवे पाटील, सहायक हवामान शास्त्रज्ञ, चिकलठाणा वेधशाळा.

हवामानात अचानक बदल झाला. हा बदल तात्पुरता आहे. 15 ऑक्टोबरनंतर हिवाळा सुरू होईल. तत्पूर्वी आठवडाभरात परतीचा मान्सून सक्रिय होईल. तापमानातील घसरण अपेक्षित नव्हती. दक्षिण, नैऋत्येकडून आपल्याकडे गार वारे वाहत आहेत.
-डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ.