आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत कुडकुडणाऱ्यांना हवी दात्यांच्या मदतीची ऊब!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरात थंडीची लाट आली आहे. अनेक गरिबांना अशा थंडीतही उघड्यावर राहावे लागते. कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांवर मृत्यूही ओढवला आहे. अशा गरीब बांधवांसाठी दिल्लीतील गुंज आणि औरंगाबादेतील सीआरटी या स्वयंसेवी संस्थांनी गरम कपडे जमा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या घरातील जुने, पण सुस्थितीत असणारे गरम कपडे दान करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

गुंजच्या वतीने दरवर्षी ‘राहत विंटर’ ही मोहीम घेतली जाते. याअंतर्गत गरीब, निराधार नागरिकांचे थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. ‘ओढा दो जिंदगी’ या उपक्रमांचा एक भाग आहे. औरंगाबादेत सिव्हिक रिस्पॉन्स टीम (सीआरटी) हा उपक्रम राबवत आहे. यात जुने ब्लँकेट, स्वेटर आणि इतर गरम कपडे गोळा करून गरजूंपर्यंत पोहोचवले जातील. समाजबांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी जुने, पण सुस्थितीतील कपडे दान करण्याचे आवाहन सीआरटीने केले आहे. कपडे जमा करण्यासाठी २६ जानेवारी ही अंतिम तारीख आहे. यासाठी अभय जरीपटके, मनजित प्राइड प्रायमो, सिल्क मिल कॉलनी, अंकित मुथियान, प्लॉट डी-३५, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज आणि स्नेहा अग्रवाल, एन-४, एफ-१ सेक्टर, ९९६०३७८५५५ तर अधिक माहितीसाठी सनवीर-९९२३७३२९३८ येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.