आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज येथील काेलगेट पावडर निर्मिती बंद, कर्मचाऱ्यांना व्हीआरएस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ मुंबई - एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीच्या कोलगेट-पामोलिव्ह इंडियाने वाळूज येथील प्रकल्पात टूथ पावडरचे उत्पादन मे २०१५ पासून थांबवले आहे. कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) स्वीकारल्याने उत्पादन थांबवत असल्याचे कोलगेट-पामोलिव्हने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, कंपनीने अचानक योजना राबवल्याने कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागणे हे दुर्दैवी असल्याचे कामगार संघटना सिटूने म्हटले आहे. कंपनीत ८४ कर्मचारी असून सर्वांनी वयाची चाळिशी ओलांडली आहे.
वाळूज एमआयडीसीत टूथ पावडर निर्मिती प्रकल्प आहे. येथे कंपनीने २९ एप्रिलला व्हीआरएस जाहीर केली. कर्मचाऱ्यांनी योजना स्वीकारल्याचे पत्र कंपनीने शेअर बाजाराला दिले आहे. कंपनीच्या केअरिंग अॅप्रोचनुसार योजनेत पॅकेज देण्यात आले असून प्रकल्पातील उत्पादन थांबवण्यात येत असल्याचे कंपनीने पत्रात म्हटले आहे. तथापि, टूथ पावडरच्या बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. मागणी पूर्णकरण्यासाठी कंपनीकडे उत्पादनासाठीचे पुरेसे पर्याय असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

६०वर्षांपर्यंतचे वेतन मिळावे, बोलणी सुरू
पुर्वसूचनादेता नोटीस लावून २५ वर्षांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असे एकतर्फी सांगणे चुकीचे आहे. चाळीशीनंतर घरांचे हप्ते, मुलांचे शिक्षण लग्न अशा विवंचना असतात. त्यामुळे उर्वरित सेवेच्या पूर्ण ६० वर्षांपर्यंतचे वेतन मिळावे. सिटूच्या या मागणीनुसार व्यवस्थापनाशी बोलणी सुरू आहे. डॉ.डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस, सिटू

विस्तार करावा
अचानकव्हीआरएस लागू करण्याऐवजी कंपनीने विस्तार करावा. यामुळे उद्योग वाढीला लागेल, अशी प्रतिक्रीया सीटुचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष उद्धव भवलकर यांनी दिली.

कर्मचारी संख्या ८४
वयोमान : सर्व ४० च्या वर
झालेली सेवा : २० ते २५ वर्षे