आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचेरीत फक्त जिल्हाधिकारीच, अन्य कोणी नाही; महसूल यंत्रणा ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विविध प्रलंबित मागण्यांसाठी पदोन्नत नायब तहसीलदार ते थेट शिपायापर्यंत सर्व महसूल कर्मचारी संपावर आहेत. त्यातच विनाचौकशी अधिकाºयांवर कारवाई होऊ नये, या मागणीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हाधिकाºयांनीही मंगळवारी अचानक संपाचा झेंडा हाती घेतला.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वगळता अन्य कोणीही नव्हते. त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळत नसल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले. महसूल कर्मचाºयांचा संप बुधवारी सायंकाळी मिटेल, अशी अपेक्षा आहे. महसूल कर्मचारी संघटना उद्या (6 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे.

उपजिल्हाधिकाºयांविरोधात, खासकरून पुरवठा विभागातील अधिकाºयांवर फौजदारी कलम 156 (3) नुसार कारवाई करताना चौकशी केली जात नाही. आधी चौकशी व्हावी आणि त्यानंतर आवश्यकता असेल तरच अटकेची कारवाई व्हावी, अशी उपजिल्हाधिकारी संघटनेची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात मात्र हिंगोलीच्या पुरवठा अधिका-यांना कोणतीही संधी न देता अटक करण्यात आली.
तेव्हाच संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला होता. शासनस्तरावर आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु महसूलच्या अन्य कर्मचाºयांनी आंदोलन हाती घेतल्यामुळे या वरिष्ठ अधिका-यांनीही आंदोलनाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारपासून शुकशुकाट होता. बुधवारी सकाळपर्यंत मंत्रालय स्तरावर चर्चा होऊन मागण्या मान्य होतील, अशी अपेक्षा उपजिल्हाधिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी व्यक्त केली.
आज संप मागे घेतला जाण्याची शक्यता : महसूल कर्मचारी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असून यात हा संप मागे घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत. त्याच बैठकीत उपजिल्हाधिकाºयांच्या संपावरही चर्चा होणार असल्यामुळे दोन्हीही संप मागे घेतले जाऊन महसूलचे कामकाज गुरुवारपासून सुरळीत होण्याची शक्यता आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात 50 हजारांवर प्रमाणपत्रांचे अर्ज थांबले आहेत. संप मिटल्यास शनिवारपर्यंत ते विद्यार्थ्यांना मिळू शकतील. कार्यालयात काम करणेच अशक्य झाल्याची भावना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी व्यक्त केली.