औरंगाबाद- जिल्ह्यातील 18 वर्षांपुढील 22 हजार महिला गायब आहेत. जनगणनेत या महिलांची नोंद झाली आहे; पण मतदार यादीत त्या दिसत नाहीत. त्यामुळे या महिला नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांना पडला आहे. या वेळी आणखी प्रयत्न करून या महिलांना शोधण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू झाला आहे. राष्ट्रीय निकषानुसार लोकसंख्येच्या 62 टक्के नागरिक मतदार असतात.
जिल्ह्यात हे प्रमाण 58.15 टक्के आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता जवळपास टक्के म्हणजेच 1 लाख 50 हजारांच्या आसपास नागरिकांच्या नावांची नोंदणी नाही, असा प्रशासनाचा अंदाज आहे. यातील पुरुषांची लोकसंख्या जनगणनेनुसार समोर येते. मात्र जनगणनेत नोंद असलेल्या 22 हजार महिला या यादीत नाहीत. त्यामुळे या वेळी पुन्हा एकदा घरोघर जाऊन मतदार नोंदणी करताना या महिलांचा शोध लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थलांतर किंवा अन्य कारणांमुळे या महिलांची नावे मतदार यादीत दिसत नसतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोकसंख्येच्या
62 टक्के नागरिक मतदार असतात मतदारांचे प्रमाण जिल्ह्यात 58.15 टक्के आहे. जवळपास 4 टक्के म्हणजेच 1 लाख 50 हजारांच्या आसपास नागरिकांच्या नावांची नोंदणी नाही, असा प्रशासनाचा अंदाज आहे. जनगणनेत नोंद असलेल्या 18 वर्षांवरील 22 हजार महिला मतदार यादीत दिसत नाहीत. नाव वगळल्याच्या यादीतही त्या नाहीत. त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत, याचा शोध या वेळी घेण्याचे आम्ही ठरवले आहे. अस्तित्वात आहेत पण यादीत नाहीत, असे होता कामा नये. -विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.