आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 पैकी 9 शारीरिक शिक्षण महाविद्यालयांवर गंडांतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित 11 पैकी 9 शारीरिक शिक्षण महाविद्यालयांची स्थिती सध्या अत्यंत दयनीय आहे. पायाभूत सुविधा आणि मान्यताप्राप्त शिक्षक नसल्यामुळे एनसीटीई म्हणजेच नॅशनल काैन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनने (३ ऑक्टोबर) महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत मान्यताप्राप्त शिक्षक नियुक्त केले नाहीत तर मान्यता रद्द करण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
अध्यापक (बीएड) आणि शारीरिक शिक्षण महाविद्यालयांसाठी (बीपीएड) एनसीटीईने ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. पायाभूत सुविधा नसलेल्या आणि विद्यापीठ मान्यताप्राप्त शिक्षकांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अतिरिक्त बांधकाम, अतिरिक्त पायाभूत सुविधा, अतिरिक्त निधी आणि अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केल्याचा अहवाल दिलेल्या (३१ ऑक्टोबर २०१५) वेळेत सादर केला नसल्यामुळे नोटीस काढण्यात आली आहे. एनसीटीईच्या समितीने पाहणी केल्यानंतरही पायाभूत सुविधा नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबरपर्यंत ज्या महाविद्यालयांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही, त्यांना २१ दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगितले आहे. आता २४ ऑक्टोबरपर्यंत समाधानकारक खुलासा सादर करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता काढण्याचा इशाराही एनसीटीईने दिला आहे. विद्यापीठ कार्यकक्षेतील ११ पैकी महाविद्यालयांना अनुदान नसल्याची माहिती आहे. अनुदान नसल्यामुळेच महाविद्यालयांत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब निदर्शनास आली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि बीड येथील नवगण शारीरिक शिक्षण महाविद्यालय मात्र अनुदानित आहेत. येथे मान्यताप्राप्त शिक्षक असल्याची माहिती आहे.

‘पीईएस’चेप्रवेश चांगले; पण अवस्था बिकट
पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचालित शारीरिक शिक्षण महाविद्यालयात तीन वर्षांचे बीपीएस, बीपीएड आणि एमपीएड प्रत्येकी दोन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. त्यापैकी बीपीएस आणि एमपीएडच्या ३० पैकी ३० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बीपीएडच्या १०० जागांपैकी १७ जणांचा प्रवेश झाला आहे. या महाविद्यालयात संस्थेचा वाद असल्यामुळे विद्यापीठाने मान्यताप्राप्त शिक्षक नियुक्त करण्याची प्रक्रिया केलेली नाही. येथे प्राचार्यांसह आठ शिक्षकांचा स्टाफ आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कातून सर्वांचे वेतन केले जात आहे.

नऊ काॅलेज विनाअनुदानित
विद्यापीठ कार्यकक्षेतील ११ पैकी शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान नाही. त्यामध्ये शहरातील चारपैकी तीन महाविद्यालयांना अनुदान नाही. सिडको येथील पद्मपाणी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पीईएस शारीरिक शिक्षण आणि सातारा रोड येथील राजीव गांधी शारीरिक शिक्षण काॅलेजांचा समावेश आहे. जालन्याच्या मत्स्योदरी, राणा प्रताप कॅलेज, कळंबच्या रणसंग्राम महाविद्यालयांसह एकूण कॉलेजला अनुदान हवे आहे.

^देशभरात शारीरिकशिक्षण महाविद्यालयांची कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. क्रीडा शिक्षक घडवणाऱ्या कॉलेजची जर अशी अवस्था असेल तर क्रीडा शिक्षक आभाळातून पडणार आहेत का? क्रीडा शिक्षक नसले तर खेळाडू कसे निर्माण होतील अन् ऑलिम्पिकमध्ये मेडल कसे मिळेल? स्थिती बिकट झाल्यामुळे देशाचे शारीरिक स्वास्थ्य बिघडले आहे. एकीकडे आपण जागतिक स्तरावर योग दिन साजरा करतो आहोत अन् दुसरीकडे शारीरिक शिक्षण महाविद्यालये आहेत. या स्थितीतून बाहेर पडण्यासासाठी सरकारने त्वरित अनुदान द्यावे. -डॉ. प्रदीप खांड्रे, सहायक प्राध्यापक, पीईएस बीपीएड कॉलेज, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...