आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉकिंग पॉइंट - पर्यटक येतात अन् जातात; आम्हाला काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद शहराचं भाग्य असं की इथे अशा काही ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांच्यामुळे या शहराला विशेष महत्त्व तर आहेच; पण या शहराचं आकर्षणही पर्यटकांना आहे. या वास्तू आजच्या राज्यकर्त्यांपैकी कोणीही उभारलेल्या नाहीत. ती सारी देण आहे ती पूर्वजांची. आजच्या राज्यकर्त्यांना केवळ त्या वास्तू सांभाळायच्या आहेत. त्या सांभाळताना त्याचा फायदाही घेता येण्यासारखा आहे. मात्र, दूरदृष्टीचा अभाव आणि संकुचित मनोवृत्ती यामुळे ते शक्य होत नाही, असाच आजवरचा अनुभव आहे. आज जे जे काही या शहराला िमळालं आहे ते अन्य देशातल्या एखाद्या शहरात असतं तर तो देशच त्याचं भांडवल करीत जगाला आकर्षित करीत राहिला असता, यात शंका नाही. आपल्याकडे मात्र, पिकतं ितथे विकत नाही, अशी परिस्थिती आहे. जगाच्या नकाशावर असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेणींसाठी पर्यटक औरंगाबादला येतात. तेही इथे विमानतळ आहे आणि बऱ्यापैकी हाॅटेल आहेत म्हणून. पण जे पर्यटक इथे येतात ते गेल्यावर या शहरात परत जाऊ नका, असाच संदेश इतरांना देत असतील याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. पर्यटकांची घटती संख्या हे त्याचे उदाहरण आहे. याचे काहीही सोयरसुतक इथल्या राज्यकर्त्यांना आणि महापािलकेला नाही. तसे असते तर काही तरी प्रयत्न करताना महापािलका िदसली असती. अजिंठा आणि वेरूळ या दोन्ही लेणी आैरंगाबाद जिल्ह्यात येतात आणि विदेशातून अथवा परराज्यातून आलेल्या पर्यटकांना याच शहरात येऊन त्या लेणींकडे जावे लागते म्हणून बोलावता ते इथे येतात. असे आयते आलेले पर्यटक म्हणजे तर महापािलकेसाठी खास पर्वणी आहे; पण कोणालाही त्याचे काहीही महत्त्व नाही. ज्यांना यायचे ते येतील, जिथे जायचे तिथे जातील आणि पुन्हा यायचे की नाही ते त्यांचे ठरवतील, अशीच भावना स्थानिक राज्यकर्त्यांची दिसते. हेच जर अन्य देशात असते तर तिथल्या स्थािनक स्वराज्य संस्थेने रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि विमानतळाबाहेर स्थानिक पर्यटन स्थळांचे मार्केटिंग केले असते. हे मार्केटिंग करताना जागतिक स्थळांना भेट देण्यासाठी तुम्ही इथे आला आहात, तुमचे स्वागत आहे असे ठळक फलक या तिन्ही िठकाणी लावले असते. ते इंग्रजी आणि अन्य प्रमुख आंतरराष्ट्रीय भाषेत िलहिले असते. शहरात आला आहात तर थोडा वेळ द्या आणि शहरातल्या पर्यटन स्थळांनाही भेट देऊन तुमचा हा दौरा अधिक आनंददायक करा, असे आवाहनही केले असते. शहरात पर्यटकांना पाहण्यासारखे काय काय आहे, त्यांचे महत्त्व काय आहे, त्या स्थळांना भेटी देण्यासाठी किती वेळ लागू शकतो, तिथे कसे पाेहोचायचे अशी सारी माहिती देण्यासाठी माहिती आणि साहाय्य केेद्र सुरू केले असते. या शहरात तुम्हाला कशाचीही अडचण आली तर महापाािलका तुमच्या मदतीला तत्पर आहे, असा िदलासाही दिला असता. पर्यटकांच्या मदतीसाठी एखादी हेल्पलाइन सुरू केली असती. त्यांच्या मुक्कामाचा फायदा घेत एखादा आकर्षक बाजारही महापािलकेला उभारता आला असता. त्यातून इथल्या कलाकारांना, कलावंतांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य झाले असते. पर्यटक जास्तवेळ या शहरात थांबले तर इथल्या व्यवहरांत वाढ होईल, नागरिकांच्या उत्पन्न वाढीला त्याची मदत होईल आणि विशेष म्हणजे महापािलकेचे आणि शहराचे नाव जगभरात चांगल्या अर्थाने घेतले जाईल, असा विचार स्थािनक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी का करत नाहीत, असा प्रश्न पडतो. पर्यटक आले तर पर्यटन विभागाचे उत्पन्न वाढेल, आम्हाला त्याचा काय फायदा असा संकुचित विचार आतापर्यंत महापािलकेतली मंडळी करीत आली की असे काही करता येऊ शकते असा िवचारही त्यांच्या मनाला शिवला नाही? अर्थात, जे लोकप्रतिनिधी आणि महापािलका यंत्रणा या शहरवासीयांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करण्याचे कर्तव्य करू शकत नाहीत ते इतका पुढचा विचार करतील, अशी अपेक्षा तरी कशी करायची, असाही प्रश्न आहेच. जगभराचे पर्यटक अनायसेच या शहरात येत असल्याने त्यांना आनंद देण्यासाठी आणि त्यांचा लाभ करवून घेण्यासाठी महापािलकेने विशेष पर्यटन स्थळ विकसित करायला हवे होते. महापािलकेने वस्तुसंग्रहालय उभे केले; पण पर्यटकांनी तिथे भेट द्यावी, यासाठी मात्र बिलकूल प्रयत्न केले जात नाहीत. असल्या कामात महापािलकेला मदत करायला अनेक उद्योजक आणि व्यापारी संघटनाही पुढे येऊ शकतात. मात्र, त्यासाठीची दृष्टी तर हवी ना?