आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे लोक संवादशील; पण नियम मोडणारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील लोकअत्यंत संवादशील (बोलके) आहेत. मात्र, वाहने चालवण्याबाबत अत्यंत बेशिस्त आहेत. ते हेल्मेटही वापरत नाहीत. वाहतूकच नव्हे, तर ते स्वच्छतेचे नियमही पाळत नाहीत, अशी झणझणीत प्रतिक्रिया दिलीय विदेशी पाहुण्यांनी! रोटरी क्लबच्या ‘यूथ एक्सचेंज प्रोग्राम’ अंतर्गत शहरात 1 वर्षाच्या वास्तव्यासाठी आलेल्या फ्रान्सच्या मार्टिन आणि र्जमनीच्या जोनस या मुलांनी भारतीयांच्या डोळ्यांत हे अंजन घातले.

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाच्या या कार्यक्रमांतर्गत फ्रान्सचे दोन आणि जर्मनीचे दोन असे चार विद्यार्थी शहरात आले आहेत. यात 2 मुली आणि 2 मुले आहेत. या कार्यक्रमांतर्गत देशातील भौतिकस्थिती, राजकीय हालचाली, सांस्कृतिक परिस्थिती, सांस्कृतिक बदल, राहणीमानाचा ते अभ्यास करणार आहेत. सुनीत आठल्ये यांच्या घरी वास्तव्यास असलेला फ्र ान्सचा मार्टिन 14 वर्षांचा तर शिवाजी गोसावी यांच्याकडे राहणारा र्जमनीचा जोनस हा 15 वर्षांचा आहे.

चंद्रकांत काळे यांच्याकडे र्जमनीची विद्यार्थिनी वास्तव्यास आहे. हे तिघेही विद्यार्थी स्टेपिंग स्टोन शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. एक फ्रान्सची विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यात वास्तव्यास आहे. भारतात येण्यापूर्वी भारताबाबत असलेली माहिती, कुतूहल, प्रत्यक्ष परिस्थितीविषयी जोनस आणि मार्टिन यांनी ‘दिव्य मराठी’शी दिलखुलासपणे गप्पा मारल्या.
भारतीय खाद्यपदार्थ चांगले पण तिखट - फ्रान्सहून आलेल्या मार्टिनला ताजमहल, हिमालय, गांधीजी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाबाबत प्रचंड कूतुहल आहे. स्वित्झर्लंडपासून अवघ्या 30 किलोमीटरवरील ऑल्पस पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लिऑन येथील तो रहिवासी आहे. सरोमी आणि नोए ही त्याच्या भावंडांची नावे आहेत. आई व्हेरोनिक्यू या एका शाळेत मुख्याध्यापिका आहे. भारतातील खाद्यपदार्थाबद्दल मार्टिन म्हणाला, इथले सर्व पदार्थ चांगले; आहेत मात्र प्रचंड तिखट आहेत. स्की करणे आवडते, आईस बाईकिंग पसंत आहे. पास्ता, फ्रेंच पॅनकेकही बनवता येतात. ‘फाईट क्लब’ आणि ‘99 युरोज’ हे आवडते चित्रपट असल्याचे तो सांगतो. कार्ल मार्क्‍सचे रिव्हॉल्युशन ऑफ सोशिओलिझम हे फ्रेंच भाषेतील पुस्तक सध्या तो वाचतोय. नेपोलियन बोनापार्टबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, ‘ही इज ए बॅड मॅन’ आम्हाला तो मुळीच आवडत नाही.
युनिफॉर्म आवडत नाही - फ्रान्समध्ये शाळेत गणवेशाची सक्ती नाही. त्यामुळे येथील शाळेत दररोज गणवेश घालून जाणे त्याला नकोसे वाटत आहे.
जर्मनीतील रस्ते उत्तम व वाहतुकीलाही शिस्त - भारतातील लोक सहज एकमेकांशी बोलतात. तर जर्मनीत लोक मात्र नेमक्या आणि ठरलेल्या लोकांशीच बोलतात. भारतातील लोक खूप मेहनती आहेत. तर जर्मनीतील प्रचंड आळशी आहेत, अशी प्रतिक्रीया गोसावी कुटुंबात राहत असलेल्या जोनस याने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘माझ्या देशातील रस्ते अत्यंत उत्तम आहेत, वाहनांनाही शिस्त आहे. माझे आजी आजोबा अनेकवेळा भारतात येऊन गेले आहेत. माझे वडील व्यवस्थापन क्षेत्रात काम करत असल्याने मी देखील याच क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करीत आहे. मात्र यात बदलही होऊ शकतो. ‘हंगर गेम्स’ हा माझा आवडता चित्रपट आहे. मला स्पॅगेटी बोलोनिज आणि मॅगी बनविता येते. माझी आई प्रोफेशनल म्युझिशियन आहे. ती व्हायोलिनवर उत्तम शास्त्रीय संगीत वाजवते. मलाही पियानो आणि व्हायोलिन वाजवता येते. मी 15 जुलैला गोसावी कुटुंबात आलो, पहिल्या अठवड्यात मला कुटुंबाची खूप आठवण आली. पण आता मी इथे रूळलो आहे. आमच्या देशात राष्ट्रगीत फक्त फुलबॉल मॅचच्या आधीच गायले जाते. पण भारतात मात्र चित्रपट पाहण्याआधी, शाळेमध्ये तर गायले जाते. मी बोलबच्चन चित्रपट पाहिला आहे.’