आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त बकोरियांनी समजावून सांगितली इलेक्ट्राॅन, प्रोटाॅनची रचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- टीडीअारघोटाळा, समांतर जलवाहिनी, बजेटमधील कामे अशा रुक्ष गोष्टींनी वेढलेल्या मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आज चक्क अध्यापनाचा आनंद लुटला. मनपाच्या शाळांत सुरू असलेल्या दहावीच्या व्हॅकेशन बॅचला अचानक भेट देत त्यांनी एका शाळेत इंग्रजी शिकवले तर एका शाळेत इलेक्ट्राॅन प्रोटाॅनची रचना आणि कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

महापालिकेच्या शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे त्यांचा दहावीचा निकाल चांगला यावा यासाठी मागील काही वर्षांपासून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदा १२ शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व्हॅकेशन बॅच सुरू करण्यात आल्या आहेत. मनपा शाळांतील शिक्षकच विद्यार्थ्यांकडून इंग्रजी, गणित विज्ञान या तीन विषयांची तयारी करून घेत आहेत. नुकतीच महापौरांनी या बॅचला भेट देऊन पाहणी केली होती. आज मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बेगमपुरा मिटमिटा येथील मनपाच्या शाळांना भेटी दिल्या. केवळ वर्गांची पाहणी थातूरमातूर चौकशी करता त्यांनी विद्यार्थ्यांचा वर्गही घेतला. या व्हॅकेशन बॅचचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक उपयोग परीक्षेत झाला पाहिजे, असे बजावताना त्यांनी या विद्यार्थ्यांची इंगजी, विज्ञान गणित या तीन विषयांची नियमित स्वरूपात बहुपर्यायी परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या. शिक्षण विभागाचा कार्यभार पाहणारे उपायुक्त रवींद्र निकम यांनी येत्या आठवड्यातच अशी परीक्षा सुरू करण्यात येईल, असे सांगितले.

काय शिकवले बकोरिया सरांनी
बेगमपुऱ्यातील विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजीचा धडा शिकवला, तर मिटमिट्यात रासायनिक संयुगे हा धडा शिकवला. याशिवाय इलेक्ट्राॅन प्रोटाॅन यांची रचना ते कसे काम करतात हे आकृतीसह शिकवले. अभियांत्रिकीतली पदव्युत्तर पदवी घेतलेल्या बकोरियांनी विज्ञान शिकवताना अधिक रस घेतला.
बातम्या आणखी आहेत...