औरंगाबाद - समांतरजलवाहिनी मार्गी लागली, भूमिगत गटार योजनेचेही काम झाले. आता उद्या-परवा १०० कोटींची एलईडीची योजना मार्गी लागेल. सगळी कामे झाली याचा आनंद आहे. आणखी चार-पाच दिवस आहे. मग नवीन चार्ज घेईल, असे सांगत मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नागपुरात बदली झाल्यानंतर
आपली प्रतिक्रिया दिली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची बदली झाली. ते आता नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती म्हणून जात आहेत. त्यांच्या जागी धुळ्याचे जिल्हाधिकारी पी. एम. महाजन येत आहेत. येत्या आठवड्यात डाॅ. कांबळे पदभार सोडतील. फेब्रुवारी २०१३ रोजी औरंगाबादेत मनपा आयुक्त म्हणून रुजू झालेले डॉ. कांबळे यांची काही महिन्यांपूर्वी पदोन्नती झाली होती. त्यांना सचिव दर्जा मिळाला होता. तेव्हापासून त्यांना बदलीची प्रतीक्षा होती. समांतर जलवाहिनीच्या हस्तांतरणाची माहिती पत्रकारांना देत असतानाच त्यांच्या बदलीचा आदेश आला आणि त्यांनी लगेच ही ब्रेकिंग न्यूज पत्रकारांना सांगितली. बदलीसाठी केलेले प्रयत्न फळाला आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ते म्हणाले, या शहरासाठी काही चांगले करता आले याचा आनंद आहे. समांतर जलवाहिनी योजना महत्त्वाची असल्याचे लक्षात आल्यानंतर योजना मार्गी लागावी यासाठी प्रयत्न केले. तेही काम सुरू झाले. भूमिगत गटार योजनाही झाली. रस्त्यांची कामे सुरू आहेत. १०० कोटी रुपयांच्या एलईडीच्या कामावर उद्या-परवा शिक्कामोर्तब करणार आहे. सगळी कामे करून जात आहे.
बदलीची बातमी कळताच शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली. वजिय वाघचौरे, प्रमोद राठोड, मीर हिदायत अली, काशीनाथ कोकाटे, संजय चौधरी, महेश माळवतकर, यांनी त्यांचे अभिनंदन केले. महापौर कला ओझा यांनीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दूरध्वनी केला.
मी आहे अजून दोन दिवस
मनपाआयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची नागपूरला बदली झाल्याचे वृत्त पसरताच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गर्दी झाली. नगरसेवक संजय चौधरी यांनी अभिनंदनाच्या नमिित्ताने त्यांच्याशी हस्तांदोलन करत ‘साहेब, माझ्या दोन फायली तुमच्याकडेच आहेत. तुम्ही निघून गेलात तर त्या मंजूर करण्यासाठी मला पुन्हा सर्वसाधारण सभेकडे जावे लागेल,’ असे सांगितले. त्यावर डॉ. कांबळे यांनी ‘काळजी करू नका. मी काही आताच जात नाही. आणखी दोन दिवस आहे. दोन दिवसांत तुमच्या दोन फायली नक्कीच फायनल करेन,’ असे आश्वासन दिले. तेव्हा एकच हशा िपकला. त्यात चौधरी, कांबळेंसह नगरसेवक काझी, जगदीश सिद्ध, प्रमोद राठोड,