आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना 7 दिवस, आठवडाभरात रस्त्यावरील साहित्य हटवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील बाजारपेठेत वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. यावर तोडगा म्हणून दुकानाबाहेर रस्त्यावर ठेवले जाणारे सामान दुकानात घ्या आणि वाहनांना वाट मोकळी करून द्या, असे आदेश शनिवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यापाऱ्यांना दिले. यासाठी व्यापाऱ्यांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर थेट कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी याकरिता विविध उपाययोजना अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. काळी-पिवळी अाणि ट्रॅव्हल्सला शहराबाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर अमितेशकुमार यांनी शहरातील बाजारपेठेतील रस्ते मोकळे व्हावेत, याकरिता उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी दुपारी व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ अमितेशकुमार यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचे स्वागत करण्यासाठी आयुक्तालयात गेले होते. या शिष्टमंडळातील सदस्य व्यापाराच्या विविध शाखांचे प्रमुख होते.
चर्चेतवाहतुकीची चर्चा : चर्चा करत असताना आयुक्तांनी व्यापाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. व्यापाऱ्यांशी तुम्ही कसा संवाद साधता, असा प्रश्न आयुक्तांनी विचारल्यानंतर व्हॉट्सअॅप, मेसेज, बैठका अशी अनेक उत्तरे मिळाली. त्यावर ते व्यापाऱ्यांना म्हणाले, तुमच्यावर वाहतुकीची जबाबदारी टाकायची आहे.
व्यापाऱ्यांकडून आयुक्तांचे कौतुक
वाहतुकीची कोंडी फोडण्याची जबाबदारी आयुक्तांनी अप्रत्यक्षपणे आपल्यावर दिली असून त्यांच्या या समयसूचकतेचे व्यापाऱ्यांनी कौतुक केले. अशाच प्रकारचे आयुक्त शहरात बदल घडवू शकतील, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांच्या तोंडून निघाल्या. या वेळी अजय शाह, तनसुख झाबंड, राजन हौजवाला, लक्ष्मीकांत राठी, झोएब येवलावाला, अनिल चुत्तर यांची उपस्थिती होती.
बाजारपेठेतील रस्ते मोकळे करा
शहरातीलगुलमंडी, राजाबाजार, पानदरिबा, टीव्ही सेंटर, औरंगपुरा, कुंभारवाडा, उस्मानपुरा, गारखेडा, मुकुंदवाडी या भागातील बाजारपेठांतील दुकानदार दुकानाबाहेर सामान ठेवतात. काही जण दुकानाबाहेर हातगाड्यांना जागा देऊन तेथे विक्रीची परवानगी देतात. यापुढे असे प्रकार चालणार नाहीत. सात दिवसांच्या आत दुकानदारांनी आपले सर्व सामान दुकानात घेऊन व्यापार करावा रस्ते मोकळे करावेत, अशी सूचना आयुक्तांनी केली.