आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केेंद्रेकरांनी दणका देताच काम सुरू, खुर्ची टाकून बसा, पण काम झालेच पाहिजे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हेकाय आहे? काम का थांबले आहे? खुर्ची टाकून बसा तिथे पण काम झालेच पाहिजे, अशा शब्दात कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल संध्याकाळी जाता जाता दिलेली सूचना तंतोतंत अमलात आणली गेली.
दोन बुलडोझर, क्रेन लावून तत्काळ काम हाती घेत ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. दुसरीकडे, कॅनडा दौऱ्याच्या खर्चावरून उठलेले वादळ अंगलट येण्याची चिन्हे दिसताच आज पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. बी. एस. नाईकवाडे यांनी दौऱ्यावर खर्च केलेले मनपाचे लाख २७ हजार रुपये परत करण्याची तयारी दर्शवली.

काल दुपारी वाजून पाच मिनिटांनी मनपा आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेला सुनील केंद्रेकर उपस्थित राहिले. सायंकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी फक्त चांगले कामच करण्याच्या तेही प्रामाणिकपणे करण्याच्या सूचना बजावल्या जाता जाता नगरसेवक सय्यद मतीन यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केलेल्या टाऊनहाॅल उड्डाणपुलाखालच्या रस्त्याची पाहणी केली. दोन महिन्यांपासून ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी रस्ता आडवा खोदण्यात आला ढिगारे तसेच ठेवून काम बंद करण्यात आले होते. आयुक्तांनी त्यावर नजर फिरवली कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना फैलावर घेतले. हे काय आहे? काम का थांबले आहे? खुर्ची टाकून बसा तिथे पण काम झालेच पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

इशारादेताच काम सुरू
त्याचापरिणाम सकाळीच पाहायला मिळाला. भूमिगत गटार योजनेचे अधिकारी, मनपाचे अधिकारी दोन बुलडोझर, पाइप दाखल झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत तर दोन मोठे पाइप टाकण्यातही आले होते. आठ दिवसांत काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत झाला पाहिजे अशी डेडलाइन केंद्रेकर यांनी दिल्याने कामाला वेग आला आहे.

पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
केंद्रेकरांनीपदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. काल नाइकवाडे प्रकरणात नगरसेवकांचा रोष त्यांना खटकला होता. ते त्यांनी पदाधिकाऱ्यांना बोलूनही दाखवले. अधिकाऱ्यांना असे टार्गेट करू नका, कामे होत नसतील तर माझ्याकडे या. मी अधिकाऱ्यांकडून कामे करून घेईन असे ते म्हणाले. त्यावर पदाधिकाऱ्यांनीही डाॅ. नाईकवाडे यांच्याबाबत आपली नाराजी का आहे, हे सांगताना त्यांना तुमच्याकडे मनपाचा चार्ज घ्यायला येऊ नका असे येऊन सांगण्याची गरज नव्हती. त्यावर हसत केंद्रेकर म्हणाले की, पण मी त्यांना म्हणालो की मला चार्ज घ्यायचा की नाही हे सांगण्याएवढे मोठे आहात का? आपण सगळे मिळून शहरासाठी चांगले काम करू या. विकासाच्या कामांसाठी मी कायम उपलब्ध आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

सकाळी सव्वा नऊला हजर
सकाळीसव्वा नऊ वाजताच केंद्रेकर मनपात आले. प्रवेशद्वारावर लावलेले कुलूपही काढण्यात आले नव्हते. त्यांना पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. लगोलग त्यांनी अधिकाऱ्यांना बोलावण्याच्या सूचना दिल्या. अधिकारीही दहाच्या आत दाखलही झाले. त्यांची बैठक घेत त्यांनी सर्वसाधारण सभेतील कामकाजाबाबत चर्चा केली सूचना केल्या. शिवाय आपल्या केबिनमधल्या अनावश्यक खुर्च्याही काढून टाकायला लावल्या फक्त चार खुर्च्याच ठेवण्याचे आदेश दिले.