आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Of Police, Law And Order ,latest News In Divya Marathi

पाच हजार पोलिस तैनात; गोंधळ झाल्यास पाच मिनिटांत पोहोचणार फौजफाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी थंडावला असला तरी राजकीय वातावरण गरमच आहे. निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले असून शीघ्र कृती दल, राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या, आयुक्तालयातील साडेतीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह होमगार्ड आणि पोलिसांचा वाहन ताफा सज्ज झाला आहे.
मतदानकाळात शहरात कुठल्याही भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांचा फौजफाटा अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचेल. प्रसंगानुरूप शस्त्रे, अश्रुधूर आणि दारूगोळा वापरण्याचे आदेशही पोलिसांना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
औरंगाबाद शहरात मध्य, पश्चिम, पूर्वसह गंगापूर आणि फुलंब्री या मतदारसंघातील काही भाग येत असल्याने पोलिस आयुक्तालयाकडे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. यासाठी केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या तुकड्या बोलावण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्रीपासूनच पोलिस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. चौदा पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात चार मोबाइल व्हॅन गस्तीवर आहेत. २०८ वाहने रात्रंदिवस चौफेर गस्तीवर असतील. १०८ बीट मार्शल संबंधित पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सतर्क आहेत. दंगाकाबू पथक, स्ट्रायकिंग फोर्स, जलद कृती दल पथकांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.