औरंगाबाद- कुणी संशयित व्यक्ती वाटत असेल किंवा कुणी पोलिस असल्याचे सांगून तुमच्याकडील मौल्यवान वस्तू मागत असेल तर ती देऊ नका. तुमच्याकडे
मोबाइल असेल तर त्या व्यक्तीचा फोटो किंवा रेकॉर्डिंग जे काही करता येईल ते करा, असा कानमंत्र पोलिस आयुक्त राजेद्र सिंह यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिला.
पोलिस आयुक्तालयातील अलंकार सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 350 ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली. पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइनमुळे
आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे फायदा झाला याबद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त करून पोलिस विभागाचे आभार मानले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दलही मत मांडले. या वेळी जयंत आर. देशपांडे, मेजर चंद्रसेन कुलथे, के. जी. शेरे पाटील, आर. आर. देशपांडे, डॉ. मंगला वैष्णव, बावस्कर ,राजलिंग स्वामी, श्रीकिसन शर्मा, शांताई ओझोन, डॉ. रोहिणी िपसोळकर, जगन्नाथ कोपरकर, गौतमकुमार जैन, मधुकर वैद्य, मालती करंदीकर, भगवान जद्दे, अनंत मोताळे, सुरेंद्रसिंग चव्हाण, जयराम बामरे, भोेसले, वाघमारे, गोविंद देशपांडे यांच्यासह असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.