आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तालयाची भिंत ढासळली, मजूर ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानाजवळील संरक्षक भिंतीला जेसीबीचा धक्का लागून ही भिंत रंगकाम करणाऱ्या मजुरावर कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अशोक कमलनाथ श्रीरंग ऊर्फ बबन, रा. कोतवालपुरा असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे.
२१ ऑक्टोबर रोजी शहीद दिन आहे. या निमित्ताने मैदानाजवळील भिंतीच्या रंगरंगोटीचे काम सोमवारी सुरू करण्यात आले. पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून जुनी इमारत पाडली जात आहे. यासाठी चार ते पाच जेसीबी लावण्यात आले. जुन्या इमारतीतील लोखंडी रॅक जेसीबीद्वारे हलवण्याचे काम सुरू होते. एम एच १२ जेके ०२५५ या जेसीबीचा चालक जुबेर खान गुलाब खान (२५ रा. रहीमनगर किराडपुरा) हा मोठे लोखंडी रॅक जेसीबीद्वारे मैदानाकडे वाहून नेत होता. जेसीबीचा पुढचा भाग मैदानाजवळील भिंतीच्या गेटमधून बाहेर निघाला मात्र लोखंडी रॅक भिंतीला अडकली. याच भिंतीला खाली बसून अशोक रंग देत होते. रॅकच्या धक्क्याने ही सहा फुटांची भिंत ढासळून भिंतीचा मोठा भाग अशोक यांच्या अंगावर पडला. त्यांच्या छातीत आणि पोटाला मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच बेगमुपरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम शेख राज्य राखीव पोलिस दलाच्या निरीक्षकांनी धाव घेतली. सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक मधुकर सावंत यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. चालकाच्या विरोधात कमल ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती निरीक्षक सलीम शेख यांनी दिली.

पोलिस आयुक्तालयाचा ब्रुसली : अशाेकलापोलिस आयुक्तालयात सर्व कर्मचारी गमतीने ब्रुसली म्हणायचे. सडपातळ शरीरयष्टी असलेले अशोक हे आयुक्तालयाच्या आवारात कामे करून पोटाची खळगी भरत. कोणाच्या घरासमाेरील गवत काढून देणे, त्यांच्या घरांना रंग देणे अशी कामे ते करायचे. ते अविवाहित होते. पुतण्या सोमनाथ त्यांचा सांभाळ करत होता.
बातम्या आणखी आहेत...