आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Commissioner Prakash Mahajan,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधी आणि कामे यांची सांगड, नवे मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांचा अजेंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बिकट आर्थिक अवस्था असताना उपलब्ध निधी आणि कामे यांची सांगड घालूनच काम करावी लागणार असून भरमसाट कामांची अपेक्षा करणे चुकीचे आहे हे पदाधिका-यांना समजावून सांगू, असे सांगत नवीन मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांनी आपण उत्पन्न वाढीवर जोर देणार असल्याचे सांगितले. सुरू असलेली कामे, उत्पन्न, खर्च, प्राधान्याने करावयाची कामे यांची माहिती आयुक्तांनी घेतली. तसेच आज त्यांनी गणेश विसर्जन विहिरींची पाहणी करून आवश्यक त्या सूचनाही केल्या.पत्रकारांशी बोलताना त्यांनी कामाचा अजेंडा समोर ठेवला. ते म्हणाले की, डेंग्यूच्या साथीबाबत आज माहिती घेतली. साफसफाईवर तातडीने लक्ष केंद्रित करण्याची गरज असून तशा सूचना दिल्या आहेत.
पैशाचा प्रश्न मोठा
आयुक्त महाजन म्हणाले की, मनपासमोर पैशाचा मोठा प्रश्न आहे. देणी खूप आहे आणि उत्पन्न मोजके आहे. निधी आणि कामे यांची सांगड घालून पुढे जावे लागणार आहे. करवसुली फक्त ६० टक्के आहे. ४० टक्के वसुली होत नाही हे गंभीरच आहे. त्यामुळे मोठी कसरत करावी लागणार आहे.