आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा चौकात रोजेदाराने फोडली वाहतुकीची कोंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पंढरपूर, तिरंगा चौकातील वाहतूक सुरळीत करताना अस्लम शेख आणि संपत पवार. छाया : धनंजय दारुंटे)

वाळूज- पंढरपूरलगतच्या तिरंगा चौकात बुधवारी दुपारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांची तारांबळ उडाली. वाहतुकीला वाट मोकळी करून देण्यासाठी रोजा पकडलेल्या अस्लम शेख आणि संपत पवार या सर्वसामान्य नागरिकांना पुढाकार घ्यावा लागला. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र, या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ असणारे वाहतूक पोलिस तासाभरानंतरही चौकात दाखल न झाल्यामुळे कामगार, नागरिक वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.
तिरंगा चौक, कामगार चौक, मोरे चौक महाराणा प्रताप चौकात दुपारी ३.३० ते ४.३० वाजता कामगारांची मोठी गर्दी असते. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने तिरंगा चौकातील अतिक्रमण तसेच पुरातन वाहतूक बेट काढून नगर महामार्ग मोकळा करण्यात आला. मात्र, वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावर पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याची खंत परिसरातील व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी (१ जुलै) रोजी दुपारी साडेचार ते पाच या वेळेतही वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा तिरंगा चौकात पाहावयास मिळाल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.