आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या दौऱ्याला डाव्यांचा विरोध, विविध ठिकाणी निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भारत भेटीवर येत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इतर पाच डाव्या पक्षांतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

अमेरिका साम्राज्यवादी असून जगभर दादागिरी करीत असल्याने त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावू नये, अशी डाव्या पक्षांची भूमिका आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करून स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘ओबामा परत जा’ अशा घोषणा दिल्या. या वेळी डॉ. कलावती पाटील, प्रकाश चौधरी, विनोद अढाळके, विजय पवार, सपना कुंभार, ज्योती पाटील, युसूफ खान, नरेंद्रसिंग, रावसाहेब धोबी राजू पटेल आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी मार्क्सवादी कम्युनिस्टसह पक्ष डाव्या पक्षांतर्फे निदर्शने करताना कलावती पाटील, प्रकाश चौधरी, विनोद अढाळके, विजय पवार, सपना कुंभार, ज्‍योती पाटील, युसूफ खान, नरेद्रसिंग पाटील, रावसाहेब धोबी आदी.