आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉ. भवलकर यांना सीपीएमकडून बाहेरचा रस्ता, आठ कार्यकर्त्यांवरही कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीयकम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते आणि ‘सिटू’चे राज्य उपाध्यक्ष उद्धव भवलकर यांना पक्षाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. सीपीएम संचालित शाळेत शिक्षक भरतीत लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराचा त्यांच्यावर आरोप आहे. पक्षाच्या चौकशी समितीतही हे स्पष्ट झाल्याची माहिती असून त्यांच्यासह आठ जणांना निलंबित केले आहे.
राजकीय पक्ष म्हटले की भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणे हे आता गृहीत धरले जाते. मात्र, डाव्या पक्षांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे ऐकिवात नाहीत. ३४ वर्षे औरंगाबादेत पक्षाचे सचिव म्हणून काम पाहिलेले आणि सिटूचे राज्य उपाध्यक्ष भवलकर यांच्यासह आठ जणांचा भ्रष्टाचारात सहभाग आढळल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. खासदार सीताराम येचुरी आणि नीलोत्पल बसू यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर येथे नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय बैठक झाली, त्या वेळी सर्वानुमते हा ठराव घेण्यात आला. राज्य सचिव डॉ. अशोक ढवळे यांच्या स्वाक्षरीचे १४ नोव्हेंबर रोजी परिपत्रक जारी केले असून पक्षाची बदनामी टाळण्यासाठी ‘टॉप सिक्रेट’ ठेवले गेले.
२१शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहाराचा आरोप
शहीदभगतसिंग क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे बजाजनगर आणि दरेगाव (जालना) येथे दोन शाळा चालवण्यात येतात. या शाळेत २०१२-१३ मध्ये २१ शिक्षकांची भरती करून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शाळा व्यवस्थापनाबाबत जिल्हा सचिव प्रा. पंडित मुंडे आणि भवलकर यांच्यात टोकाचा वाद आहे. चौकशी समितीतर्फे भवलकरांची झाडाझडती घेण्यात आली. महेंद्रसिंग, विजय गाभणे, उदयन शर्मा आणि ठेकेदत्त यांच्या समितीने त्यांना दोषी धरत बसू यांच्याकडे अहवाल पाठवला होता. त्यानंतर राज्य कार्यकारिणीत कारवाईला मंजुरी मिळाली. राज्य सचिव डॉ. अशोक ढवळे यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी मानकापेंवर कारवाई केल्याचे सांगितले, मात्र भवलकरांविषयी ‘नो कॉमेंट’ असे उत्तर दिले.
मी पुन्हा सक्रिय होईन
-पक्षाकडेअपील केले असून माझ्यावरील कारवाईला लवकरच स्थगिती मिळेल. मी भ्रष्टाचार केलाच नाही. शाळांची स्थापना मी स्वत:च केली आहे. कारवाई दुर्दैवी असून लवकरच निलंबन मागे घेऊन मी पुन्हा सक्रिय होईन. उद्धवभवलकर, राज्यउपाध्यक्ष, सिटू
आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई
दामोदरमानकापेंची पक्षातून हकालपट्टी, तर भवलकरांसह संस्थेचे कोशाध्यक्ष अण्णा सावंत, वसंत घुले आणि लक्ष्मण साक्रुडकर यांना प्रत्येकी तीन, तर गंगाधर शेवाळे, संजय गौकुंदे आणि पार्वती सावंत यांना प्रत्येकी एक महिन्यासाठी निलंबित केले. शिवाय शालेय व्यवस्थापनाचे पुढील अधिकार प्रा. मंुडे आणि भगवान भोजने यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.