आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Community In Social Work, Education, Helth For Help

ऐक्यातून समाजासाठी कार्य, हिंदू-मुस्लिम तरुण शिक्षण, उपचारासाठी गरजूंना करताहेत मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- असहिष्णुतेवरून देशभरामध्ये वादंग उठले असताना शहरातील हिंदू-मुस्लिम तरुण मात्र समाजासाठी झटत आहेत. ऑल इंडिया पयाम-ए-इन्सानियत फोरमच्या माध्यमातून गरीब, गरजूंचा शैक्षणिक खर्च, वैद्यकीय उपचार, रक्ताची गरज भागवणे, औषधींचा खर्च आणि करिअर गाइडन्स यासारखे उपक्रम शहरात १० वर्षांपासून राबवत मानवतेचा संदेश दिला जात आहे. देशभरात या कामाला १९७२ पासून लखनऊ येथून सुरुवात झाली.

फोरममध्ये सर्व समाजातील सेवा करणारे डॉक्टर, इंजिनिअर, फार्मासिस्ट, विद्यार्थी नि:स्वार्थपणे काम करत आहेत. कर्करोग, क्षयरोग, दमा, अॅपेंडिक्स, हृदयरोग असे आजार असणाऱ्या मराठवाड्यातील हजारो रुग्णांच्या उपचाराचा खर्च फोरमने उचलला आहे. याशिवाय आजवर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम फोरमच्या वतीने वेळोवेळी घेतले जातात. जातीपातीचा भेद बाळगता समाजातील सर्व गरजूंचा खर्च केला जात आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सेवा पुरवण्याचे कामही अनेकवर्षांपासून केले जात आहे. या फोरमच्या अध्यक्षपदी प्रा. जकियोद्दीन सिद्दिकी, सचिवपदी प्रदीप शंकर बोरा काम करत आहेत.

मौलाना जुनेद फारुखी, अमनदीप सिंग, हाशिम खान, अमित लोणकर, शुभम दांडेकर, हर्षल दीक्षित, आशिष, उजैफा, ओंकार सिंग, पीयूष, दत्तात्रय मणिपुरी, इलियास, एहतेश्याम, अब्दुल मुक्तदीर, अभिजित, सागर, कपिल देशमुख, अब्दुल हई, नदीम अशी टीम फोरममध्ये सेवा देण्याचे काम करत आहे. फाेरमची स्थापना लखनऊ येथे हजरत मौलाना सय्यद अबुल हसन अली नदवी यांनी १९७२ मध्ये केली होती. देशभर याच्या शाखा वाढत गेल्या लोक जुळत गेले. या फोरमच्या देशभर शाखा स्थापन झाल्या आहेत. फोरममध्ये शहरात विविध क्षेत्रांतील जवळपास ५०० सदस्य असून ३० जण सक्रियपणे काम करत आहेत.

याउपक्रमांवर भर
सर्वसमाजातील गोरगरीब, गरजूंचा शैक्षणिक खर्च, छोट्या-मोठ्या आजारांवर रुग्णांच्या उपचारावरील खर्च उचलणे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करणे, रक्ताची जुळवाजुळव करणे, वृद्धांना कपडे, ब्लँकेट, चादरींचे वाटप करणे, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, बुद्धिमत्ता चाचणी घेणे आदी कार्यक्रम फोरमच्या वतीने सतत राबवण्यात येत आहेत.

सर्वधर्मीय आले एकत्र
मानवतेलाजिवंत ठेवण्याचे काम या फोरमच्या माध्यमातून केले जाते. फोरममध्ये देशभरातून सर्व समाजाचे लोक जुळलेले आहेत. फोरम स्वत: सर्व खर्च उचलते. यात जोडले गेलेले सदस्य हे नोकरी करणारे, शिक्षण घेणारे तसेच विद्यार्थी आहेत. नजीबफैसल, प्रवक्ता, एआयपीआयएफ

येथे करा संपर्क
शहर,मराठवाड्यातील गरजूंना काही मदत लागल्यास त्यांनी दुकान नं.२ नाज कॉम्प्लेक्स, सिटी चौक येथे संपर्क साधावा. संबंधितांची माहिती घेऊन त्यांना योग्य ती मदत करण्यात येईल, असे फोरमच्या वतीने सांगण्यात आले.