आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समांतर’ वाचवण्यासाठी कंपनीचा आटापिटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या दोन, चार दिवसांत समांतरचा करार औपचारिकपणे संपुष्टात येण्याआधी करार वाचवण्यासाठी कंपनीच्या वतीने निकराचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीने महापौरांना पत्र लिहून आम्हाला आमचे म्हणणे सर्वसाधारण सभेसमोर मांडू द्या, अशी मागणी केली आहे.यावर मात्र निर्णय झालेला नाही. ३० जून रोजी सर्वसाधारण सभेने समांतरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानंतरची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली. स्पष्टीकरणासाठी एक महिन्याची मुदत देणाारी नोटीस कंपनीला बजावण्यात आली. त्यावर कंपनीने उत्तरही पाठवले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महापालिका समांतरचा करार रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेणार आहे. त्या आधी करार वाचवण्याचा प्रयत्न म्हणून कंपनीचे व्यवसायप्रमुख महंमद तारेक खान यांनी थेट महापौर त्र्यंबक तुपे यांना पत्र लिहून कंपनीला बाजू मांडण्याची संधी देण्याची मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...