आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competition Between Tanwani And Kenekar For BJP City President Post

भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी आता तनवाणी अन् केणेकरांत स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार किशनचंद तनवाणी संजय केणेकर हे दोघे अंतिम स्पर्धेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजून कोणताही निरोप आल्याने शहराध्यक्षपदाची निवड बुधवारी करायची की गुरुवारी हे अजून ठरलेले नाही. या निवडीत संघाची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असणार असल्याचे अधोरेखित आहे.

सोमवारी सहा मंडळ अध्यक्षांची निवड झाली होती. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उर्वरित दोन मंडळ अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या निवडी झाल्यानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता शहराध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावण्यात येणार असल्याचे पूर्वी सांगण्यात आले होते. परंतु मंगळवारी सायंकाळपर्यंत बुधवारच्या बैठकीसाठी पदाधिकाऱ्यांना कोणताही निरोप देण्यात आला नव्हता. यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संघाचा निरोप नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.

दुसरीकडे शहराध्यक्ष कोण, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. कालपर्यंत अनेक नावे चर्चेत होती. परंतु मंगळवारी सायंकाळी तनवाणी किंवा केणेकर या दोघांतून एकच अध्यक्ष होईल, असे चित्र निर्माण झाले. या दोघांशिवाय तिसऱ्या कोणाचे नाव फक्त संघाकडूनच समोर येऊ शकते. त्यात माजी उपमहापौर संजय जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. संघाचा निरोप केव्हा येतो याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे. मनपा निवडणुकीत तनवाणी यांनी गुलमंडी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले होते. त्याचबरोबर अपक्षांना मदतीला घेत एक शहर विकास आघाडी पालिकेत स्थापन केली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ते या पदासाठी हवे असल्याचे समजते.

पुढे वाचा... ‘गुड बुक’मधील असेल अध्यक्ष, जुने सर्व एकवटले