आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competition Examination,Latest News In Divya Marathi

लिपिक टंकलेखक पदासाठी झाली परीक्षा; 3 हजार 61 परीक्षार्थ्यांनी दिली एमपीएससीची परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लिपिक टंकलेखक पदासाठी 27 जुलै रोजी जिल्ह्यात 3 हजार 61 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्हाधिकारी अरुण शिंदे व निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या मार्गदर्शनात परीक्षा शांततेत पार पडली. शहरातील 13 परीक्षा केंद्रांवर रविवारी लिपिक टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी शहरातील 3 हजार 370 परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, परीक्षेदरम्यान 309 परिक्षार्थी गैरहजर होते.
परीक्षार्थ्यांना आद्याक्षरानुसार परीक्षा केंद्रांची वाटणी करण्यात आली होती.परीक्षा समन्वयक भगवान उजाडे, सतीश ढोले, मोहन साठे यांनी काम बघितले. शहरात 13 परीक्षा केंद्रावर झालेल्या परीक्षेदरम्यान कुठल्याही प्रकारची अनुसूचित घटना घडली नाही. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. यावेळी सर्वच परीक्षा केंद्रांवर सुरक्षेसाठी पोलिस तैनाद करण्यात आले होते.