आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या झेरॉक्स विकणारे अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या झेरॉक्स प्रतींची विक्री करणार्‍या औरंगपुर्‍यातील गुरुप्रसाद झेरॉक्स सेंटरवर छापा मारून गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली. तसेच झेरॉक्स मशीन व इतर साहित्यासह पावणेचार लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.

पुण्याच्या सागर पब्लिकेशनची टीईटी पेपर एक, दोन, समग्र बालमानसशास्त्र व अध्ययन पद्धती, एसटीआय, उपनिरीक्षक पदाच्या पूर्व स्पर्धा परीक्षेची पुस्तके स्कॅन करून त्याच्या झेरॉक्स काढून विकल्या जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. बुधवारी दुपारी झेरॉक्स सेंटरवर छापा मारून दुकानमालक सोमनाथ कचरू दहातोंडे (26, रा. खोकडपुरा), झेरॉक्स ऑपरेटर सचिन किशोर सोनवणे (24, रा. समतानगर), विशाल सुभाष कावळे (24, रा. कामगार कॉलनी, खोकडपुरा) यांना पकडण्यात आले. सागर पब्लिकेशनचे मिहिर यदुनाथ थत्ते यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात कॉपीराइट अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.