आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : खड्डयाला अटक करा, औरंगाबादच्‍या तरुणाची पोलिसात तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्‍याची पर्यटन राजधानी म्‍हणून लौकिक असलेल्‍या औरंगाबाद शहरातील प्रमुख रस्‍त्‍यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेत. त्‍यामुळे अपघात वाढले असून, वाहनधारक त्रस्‍त झाले आहेत. अशाच एका त्रस्‍त वाहनधारकाने चक्‍क खड्डयाच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. एवढेच नाही तर खड्डयावर गुन्हा दाखल करून त्‍यांना अटक करण्‍याची मागणीसुद्धा त्‍याने केली. भारत फुलारे असे त्‍या वाहनधारकाचे नाव आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?
> भारत फुलारे हा ट्रक चालक असून, तो वाळूज परिसरात राहतो.
> त्‍याने वाळूज पोलिस ठाण्‍यात दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले, खड्डयांमुळे माझा अपघात होत होता. तसे झाले असते तर माझ्या विरोधातच पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असता.
> त्‍यामुळे आता खड्डयांवर गुन्‍हा दाखल करा, अशी मागणी त्‍याने केली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, औरंगाबाद शहरातील प्रमुख रस्‍त्‍यांची कशी झाली अवस्‍था...


फोटो - महेश घोराळे
बातम्या आणखी आहेत...