आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाच्या स्वच्छता अॅपवर बिहारामधील तक्रारी, 40 पैकी 10 तक्रारी बिहारमधील औरंगाबादच्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील स्वच्छतेबाबत तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील हजार ४४ शहरांसाठी अॅप तयार केले. ते अॅप नुकतेच सुरू करण्यात आले. आपल्या महानगरपालिकेकडे दुसऱ्या दिवशी ४० तक्रारी आल्या, परंतु त्यातील १० तक्रारी या बिहारमधील औरंगाबाद शहरातील होत्या. त्या बिहारच्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनी त्या थेट डिलिट करून टाकल्या. त्या महानगरपालिकेला कळवण्याचे औदार्य दाखवले नाही.

 
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभाग वाढवण्यासाठी महापालिकेने नुकतेच हे अॅप कार्यान्वित केले आहे. या अॅपवर नागरिकांनी केलेल्या अस्वच्छतेच्या तक्रारींचा तीन-चार दिवसांत निपटारा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने शहरातील नागरिकांनी आपल्या मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. अनेक नागरिकांनी अॅप डाऊनलोड करत महापालिकेकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत काही ठिकाणी कचरा उचलणाऱ्या गाड्या आल्या नाहीत, काही ठिकाणी कचरा साचलेला आहे किंवा महापालिकेने कचरा साठवून ठेवला आहे, अशा स्वरूपाच्या ४० तक्रारी प्राप्त झाल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. त्यातील १० या बिहारच्या औरंगाबादच्या असून त्या डिलिट केल्या. तक्रार आल्यानंतर संबंधित स्वच्छता निरीक्षकाकडे ती पाठवली जाते. नागरिकांनी अपलोड केलेला अस्वच्छतेचा फोटो पाहून स्वच्छता निरीक्षक त्या भागात जाऊन लगेच सफाई करतो. आतापर्यंत आलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा लगेच करण्यात आला आहे . 


लोकसंख्येनुसार टक्के नागरिकांनी अॅप वापरण्याची अट 
शहराच्यालोकसंख्येनुसार किमान दोन टक्के नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड करण्याचे बंधन घातले आहे. तसे केले तरच १५० गुण मिळू शकतील. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात औरंगाबाद मनपाला २९९ नामांकन मिळाले होते. त्यात अॅपसाठीचे गुण मिळू शकले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...