आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड तालुक्यातील सहा गावे हरवल्याची तक्रार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- तालुक्यातील सहा गावे हरवली असुन ही गावे शोधुन द्यावी असा तक्रार अर्ज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. रविंद्र मोतींगे यांनी याबाबतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तालुक्यातील खापेश्वर, झाडेगावतांडा, मांडवा, सावरखेडा, शिंदेवाडी व घाडेगाव या गावांमध्ये खासदार निधी खर्च झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरुन समजले. शोध घेऊनही तालुक्यात ही गावे सापडली नाहीत. त्यामुळे आता पोलीसांनी या गावांचा शोध घेऊन हरवलेली गावे शोधुन द्यावी असा मजकुर तक्रार अर्जात आहे.
 पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आलेला आहे, याबाबत निर्णय घेऊ. माणसं हरवतात पण गावे हरवल्याचे कधी घडत नाही. अर्जाबाबत लवकरच अर्जदारास उत्तर देण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक मारूती पंडीत यांनी सांगितले.
  
बातम्या आणखी आहेत...