आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपोस्टिंगच्या नावावर धूळफेक; चिकलठाण्यातील शेतीही संपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युनायटेड स्पिरिट मधून निघणाऱ्या दूषित पाण्याचा प्रवास केवळ ब्रिजवाडीतच थांबत नाही, तर तेथून पुढे किमीचे अंतर पार करत हे पाणी चिकलठाणा परिसरात गट क्रमांक ३२८ मधील १३ एकर जागेवरील कंपोस्टिंगच्या प्रकल्पापर्यंत पोहोचते. येथे परत तीन शेततळ्यात हे पाणी साठवले जाते. नंतर यापासून कंपोस्टिंग केले जाते. प्रत्यक्षात कंपोस्टिंग केवळ देखावा असून कंपनीतून निघत असलेले पाणी आणि कंपोस्टिंगचे प्रमाण यात काहीच ताळमेळ नाही. अनेक ठिकाणी तर हे पाणी भूमिगत पाइपद्वारे शेतात सोडले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
युनायटेड स्पिरिट कंपनीमधून निघणारे दूषित पाणी ब्रिजवाडीतील गट क्रमांक ११ येथील शेतात सुमारे लाख लिटर क्षमतेच्या तीन शेततळ्यांत साठवले जाते. कंपनीच्या मागील बाजूस एकर जागेवर ही शेततळी आहेत. मात्र, ही शेततळी व्यवस्थित काम करत नसल्यामुळे इथले भूजल प्रदूषित झाल्याचे डीबी स्टारने पहिल्या भागातील वृत्तातून दिले. ब्रिजवाडीतून या पाण्याच्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू हाेतो. येथून ते तब्बल किलोमीटरचे अंतर पार करत चिकलठाणा ते हर्सूल सावंगी बायपासवरील गट क्रमांक ३२८ मध्ये असणाऱ्या कंपोस्टिंगच्या प्रकल्पापर्यंत नेले जाते.

प्रक्रियेसाठी कंपोस्टिंगचा प्लँट
एकलिटर स्पिरिट तयार करताना तब्बल १२ लिटर दूषित पाणी म्हणजेच स्पेंट वॉश निघते. नियमाप्रमाणे कंपनीतून एकही थेंब पाणी विनाप्रक्रिया बाहेर सोडता येत नाही. ही प्रक्रिया करण्याचा उत्तम उपाय म्हणून खतनिर्मिती किंवा कंपोस्टिंग आहे. यासाठी कंपनीने गट क्रमांक ३२८ मध्ये १३ एकर जागेवर कंपोस्टिंगचा प्लँट टाकला आहे. कंपनी यासाठी शेतकऱ्याला महिन्याकाठी भला मोठा किराया देते. कंपोस्टिंगसाठी कंपनीला बायोमासची गरज भासते. हे बायोमास म्हणजेच साखर कारखान्यात ऊस क्रश केल्यानंतर उरलेले (पाचट) असते. यालाच ‘प्रेसमड’ असेही म्हटले जाते. युनायटेड स्पिरिटमधून निघणारे पाणी आणि प्रेसमेडचे प्रमाण यांच्यात मात्र ताळमेळ बसत नाही. तो असा...

कुठलाही ताळमेळ नाही
- युनायटेड स्पिरिटमध्ये दररोज ३० ते ४० हजार लिटर अल्कोहोलची निर्मिती होते. म्हणजेच यातून सुमारे ते लाख लिटर स्पेंट वॉश बाहेर पडते.
- दररोज लाख लिटर स्पेंट वॉश प्रतिदिनप्रमाणे हिशेब केला तर महिने आणि महिन्यातील ३० दिवस या प्रमाणात वर्षाकाठी ७२ लाख लिटर स्पेंट वॉशची निर्मिती होते.
- लिटर स्पेंट वॉशवर प्रक्रिया करण्यासाठी एक किलो बायोमास म्हणजेच प्रेसमड लागते. म्हणजेच ७२ लाख लिटर स्पेंट वॉशवर प्रक्रिया करण्यासाठी २४ हजार मेट्रिक टन बायोमास लागतो. या प्रेसमडची किंमत १००० रुपये प्रतिटन आहे. म्हणजेच वर्षाकाठी यासाठी कोटी ४० लाख रुपये खर्च होतात.

प्रत्यक्षात काय ?
कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात कंपनी केवळ ३००० टन प्रेसमड आणते. यासाठी अवघे ३० लाख रुपये लागतात. म्हणजेच वर्षाकाठी कंपोस्टिंगमधून तब्बल कोटी १० लाख रुपये वाचतात. कंपोस्टिंग केले तर त्या ठिकाणची वॉशिंग, ट्रान्सपोर्ट असा आणखी एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च वाढतो. म्हणजेच कंपोस्टिंग करून कंपनीला दरवर्षी सुमारे ३.५ ते कोटी रुपयांची बचत करता येते. यात अर्ध्यापेक्षा कमी पाण्यावरच प्रक्रिया संभव आहे. मग उर्वरित पाण्याचे काय होते, हा प्रश्न निर्माण होतो.

येथेही माेडले नियम
नियमा प्रमाणे स्पेंट वॉश फार तर महिना स्टोअर करता येते. मात्र, यूबी ग्रुप महिनोन््महिने स्पेंट वॉश जमा करते. कंपनीतील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे ते कोटी लिटर स्पेंट वॉश जमा केले जाते.

महिनोन् महिने पाणी साठवतात
यातळ्यांमध्येमहिनोन् महिने पाणी साठवले जाते. त्याच्या दुर्गंधीने आम्हाला खूप त्रास होतो. आमची शेती गेली. पाणी खराब झाले. आमचे आरोग्यही धोक्यात आले आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून येथे काम सुरू आहे. हे प्रकार तत्काळ बंद व्हावेत. -संजयधोत्रे, सारंगधोत्रे, भाऊसाहेब गाजरे, किरण गाजरे, त्रस्त शेतकरी

मंडळाचे दुर्लक्ष
शेततळ्यांमुळे होत असलेल्या नुकसानीची आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेकदा तक्रार केली आहे. पण ते याकडे दुर्लक्ष करतात. ही कंपनी मंडळाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. पण तेथे काय सुरू आहे हे मंडळाला माहिती नसावे याचे आश्चर्य वाटते . -जगन्नाथरिठे, विश्वनाथकावडे, त्रस्त शेतकरी

आम्ही पाहणी करणार
डीबीस्टार मधील वृत्ताची आम्ही गांभिर्याने दखल घेतली आहे. सोमवारी आमच्या अधिकाऱ्यांमार्फत या कंपनीतील या सर्व प्रकाराची प्रकल्पाची पाहणी करू. त्यानंतरच कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. -धनंजयपाटील, प्रादेशिकअधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

उत्पादकता घटते
या कंपनीतून निघणाऱ्या स्पेंट वॉशमध्ये सल्फेट, फॉस्परस, क्लोराइड आणि नायट्रेट मोठ्या प्रमाणात असते. हे घटक पिकांसाठी उपयुक्त असल्याचे सुरुवातीला वाटते. पण याचा जसजसा संचय वाढतो. तशी उत्पादकता घटत जाते. हे घटक पावसाच्या पाण्यासोबत वाहत जाऊन परिसरातील इतर जलसाठेही दूषित करतात. हे टाळण्यासाठी जैविक वायू निर्मितीचा पर्याय आहे; परंतु यातून फार मोठा फायदा होत नसल्याने कंपन्या याकडे दुर्लक्ष करतात. -प्रा.बलभीम चव्हाण, पर्यावरणशास्रविभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
पर्यावरणाचे वाटोळे : अंतिम भाग

५०० एकर शेतीचे नुकसान
कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील अनेक शेतांमध्ये भूमिगत पाइपलाइनद्वारे हे पाणी जमिनीत सोडले जाते. यासाठी कंपनीने आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांशी करार केला आहे. काही शेतीचे मालक बाहेरगावी आहेत. त्यांनी येथे केअरटेकर ठेवलेले आहेत. काहींना शेतीत इंटरेस्ट नसून जमिनीचे भाव वाढण्याची ते वाट बघताहेत. त्यामुळे जमिनीचा कस गेला तरी आजघडीला हातात पैसा मिळतोय हेच त्यांना महत्त्वाचे वाटतेय. अशा पद्धतीने ५०० एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. भूजलही प्रदूषित झाले आहे. हे काम एवढ्या सफाईदारपणे करण्यात येत आहे की कोणाचेच त्याकडे लक्ष जात नाही. पूर्वी जे लोक कंपोस्टिंगच्या युनिटमध्ये काम करायचे ते आता दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्योगात उतरले आहेत. काही पाणी पुरवण्याचे, तर काही वाहतुकीचे कंत्राट घेतात.