आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिल्लोडला रसायनाच्या स्फोटात एक ठार; सासमकर आर्ट स्टुडिओत झाला स्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- शहरातील कृषी उत्पन्न समितीच्या आवारातील  शिल्पकार सासमकर आर्ट स्टुडिओत झालेल्या रसायनाच्या स्फोटात महादू तुकाराम कदम हा कामगार ठार झाला, तर स्टुडिओचे मालक राजेश रामचंद्र सासमकर गंभीर जखमी झाले. 


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शिल्पकार  सासमकर आर्ट स्टुडिओत सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मोठा आवाज झाला. सुरुवातीला गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असे वाटले. स्टुडिओकडे लोकांनी धाव घेतली. या घटनेत महादू तुकाराम कदम (१८, रा. कदमवाडी, सिल्लोड) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थरोळ्यात तो पडलेला होता. स्टुडिओचे मालक राजेश रामचंद्र सासमकर यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. सासमकर यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो

बातम्या आणखी आहेत...