आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आई-बाबा-भाऊ मला माफ करा\' म्हणत औरंगाबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांने केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गणेश शंकरराव कोपरवाड (वय-23) असे मृत विद्याथ्याचे नाव आहे. गणेश हा संगणकशास्त्र विभागातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. विद्यापीठात तो भावासोबत राहात होता. प्रेमप्रकरणातून गणेश याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आई-बाबा- भाऊ मला माफ करा...
- मिळालेली माहिती अशी की, गणेश कोपरवाड याने विद्यापीठातील वसतिगृह क्र.1च्या खोली क्र.98 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
- गणेश याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. 'आई-बाबा-भाऊ मला माफ करा', असा सुसाइडमध्ये गणेश याने उल्लेख केला आहे.
- बेगमपुरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्‍यात आली असून उपपोलिस निरीक्षक राहुल रोडे पुढील तपास करत आहेत.
- दरम्यान, वसतिगृहात प्रेमप्रकरणातून विद्यार्थाने आत्महत्या केल्याची महिनाभरात ही दुसरी घटना आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...