आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comrade Govind Pansare Attack Reaction On Social Media

'होय मी मरायला तयार आहे', कॉम्रेड पानसरेंवरील हल्ल्यानंतर उमटल्या प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाला. सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या कॉम्रेड पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यांच्या शरीरात एक गोळी असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी पहिल्या मेडिकल बुलेटीनमध्ये सांगितले. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत त्यांच्या पत्नी कॉम्रेड उमा पानसरे या देखील जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.
80 वर्षांच्या निशस्त्र पुरोगामी नेत्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याविरोधात कोल्हापूर, औरंगाबाद आणि नाशिक सारख्या अनेक शहरांमधून डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्ष होऊन गेले, अजूनही त्यांच्या मारेकर्‍यांचा पत्ता लागलेला नाही. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एका पुरोगामी विचारांच्या नेत्यांची हत्या झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी 'होय, मी मरायला तयार आहे.' अशी पोस्ट टाकून फेसबुकवर या हल्ल्याचा निषेध केला आहे. अनेकांनी फेसबुक वॉलवर या हल्ल्याचा निषेध केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पत्रकारांपासून सर्वसामान्यांनी व्यक्त केला निषेध