आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Concept Of District Guardian Minister Ramdas Kadam

गरीब शेतक-यांची यादी येत्या 15 दिवसांत उपलब्ध होणार, आत्महत्येपासून रोखण्यासाठी उपाययोजना करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- येत्या सोमवारपासून तलाठी, ग्रामसेवक शेतक-यांच्या घरोघरी जाऊन तुमची शेतजमीन किती, तुमच्या डोक्यावर बँकेचे तसेच खासगी कर्ज किती, मुलगी लग्नाची आहे काय, घरात धान्य किती, अशी माहिती विचारण्यासाठी येणार आहेत. टंचाईत कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी ही माहिती मागवण्यात येत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी ही संकल्पना मांडली असून येथे त्यातून काही फलित मिळाले तर राज्यभर त्याचा विचार केला जाईल, असे कदम यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून महसूल प्रशासन कामाला लागले असून सोमवारपासून शेतकऱ्यांच्या दारी ही मंडळी कागद, पेन घेऊन दाखल होईल.

मदतीचे आश्वासन
शेतक-यांना सध्या दुष्काळी मदत दिली जात असली तरी अत्यंत गरीब अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांना यापुढे जाऊन मदत केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांना मनरेगातून रोजगाराचा मोबदला देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते. वर्षातील काही दिवस या कामाचा मोबदला दिला जाईल. जेणेकरून शेतकऱ्यांसमोर आजची चिंता राहणार नाही.

जमिनीची माहिती आहे, पण कर्जाची नाही
प्रशासनाकडे जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे, याची माहिती सध्याही उपलब्ध असली तरी त्याच्यावरील जबाबदारीची मात्र कल्पना नाही. त्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. १५ दिवसांत अहवाल आल्यानंतर त्यावर पुढील निर्णय होईल.