आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवी अर्हतेतून शिक्षकांना सूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांना पदवी शिक्षण बंधनकारक करणारी अट शासनाने रद्द केली आहे. 20 ऑगस्टला हे परिपत्रक काढण्यात आले होते. या निर्णयाचा लाभ औरंगाबाद विभागातील 9 हजारांवर शिक्षकांना मिळेल.

केंद्र सरकारच्या ‘मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम 2009’ नुसार आठवी इयत्तेपर्यंत शिकवणा- या शिक्षकांकडे पदवीपर्यंतची अर्हता असणे सक्तीचे केले होते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना ही अट घालणे चुकीचे असल्याचे अमरावती विभागातील महाराष्‍ट्र राज्य शिक्षण परिषद तसेच औरंगाबाद शिक्षक संघटनेच्या पदाधिका- यांचे म्हणणे होते. आमदार रामनाथा मोते, आमदार भगवानराव साळुंके यांनी शिक्षकांची ही मागणी मागणी लावून धरली. त्यामुळे शासनाने शुद्धिपत्रक काढून या शिक्षकांना पदवी परीक्षा व शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यातून सूट दिली आहे. ही माहिती शिक्षक परिषदेचे विभागीय कार्यवाह रमेश चांदूरकर यांनी दिली. राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.