आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाइप प्रस्तावावरून संघर्ष, भाजप-एमआयएमचे नगरसेवक शिवसेनेविरुद्ध आक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर जलवाहिनी योजनेत एचडीपीई पाइप वापराचा प्रस्ताव शनिवारी सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. त्याविरुद्ध पवित्रा घेत भाजपचे बहुमत आणि सभापती असलेल्या स्थायी समितीत डीआय पाइपच वापरावेत, असा निर्देश देणारा प्रस्ताव सोमवारी (२२ जून) मंजूर करण्यात आला. यामुळे सर्वसाधारण सभा विरुद्ध स्थायी समिती असे चित्र निर्माण झाले आहे. या वादाचा समांतरच्या कामावर परिणाम होणार नाही, असा दावा समांतरचा ठेका मिळालेल्या कंपनीने केला आहे.
सोमवारच्या पहिल्याच स्थायी समिती बैठकीत भाजपचे नितीन चित्ते, कमल नरोटे, एमआयएमचे अज्जू नाइकवाडी, इर्शाद खान शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल यांनी या विषयावरून प्रशासनासोबतच शिवसेनेला खऱ्या अर्थाने घेरले. बारवाल यांनी एचडीपीईला मान्यता मिळेल की नाही माहीत नाही, त्याला किती वेळ लागेेल माहीत नाही. विलंब लागला तर खर्च वाढेल, असे म्हणत समांतरच्या करारात नमूद केल्यानुसार डीआय पाइपच वापरून काम सुरू ठेवावे, असा ऐनवेळचा प्रस्ताव आणला. चित्ते यांच्यासह भाजप एमआयएमच्या नगरसेवकांनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडून करारात काय म्हटले आहे हे वदवूनच घेतले. डीआय पाइप करारात नमूद करण्यात आल्याचे कोल्हेंनी बारवाल यांनी मोहन मेघावाले यांचा उल्लेख करीत त्यांच्यावर दोन्हीकडून दबाव आहे, असे विधान केले. मग मेघावाले, मकरंद कुलकर्णी, ज्योती पिंजरकर, रावसाहेब आमले यांनी आमच्यावर कुणाचा दबाव नाही, असे सांगत लोकांना पाणी मिळावे हीच भावना असल्याचे सांगितले. तर नाइकवाडी यांनी ‘तुम्ही समांतरचे अधिकारी असल्यासारखे खुलासे करीत आहात’ असा वर्मी घाव घातल्याने शिवसेनेचे सदस्य चांगलेच भडकले. या वादातच सभापती दिलीप थोरात यांनी बारवाल यांचा प्रस्ताव मंजूर करीत असल्याचे जाहीर केले. आजच्या सभेत शिवसेनेकडून स्थायी समितीत अनुभवी सदस्य नसल्याची उणीव जाणवली. समांतरचा बचाव करता करता मोहन मेघावाले, मकरंद कुलकर्णी थकत होते.
काम सुरूच राहणार
- पाइप खरेदीस विलंब लागल्यास समांतरचे कामही रखडू शकते. म्हणून आम्ही आमच्या स्तरावर मंजुरी घेण्यासाठी केंद्र सरकारकडे जाऊ. केंद्राने यापूर्वी अनेक ठिकाणी एचडीपीई पाइपसाठी मंजुरी दिली आहे.
अर्णब घोष, समांतर प्रकल्प प्रमुख
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, डीआय ते एचडीपीई...
बातम्या आणखी आहेत...