आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confusion In Holikrosa For Leggings Waring In Aurangabad

लेगिंग घालण्यावरून "होलीक्रॉस'मध्ये गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शाळेचा युनिफॉर्म निश्चि केलेला असताना स्कर्ट सोबत लेगिंग घालून का आलात. असा प्रकार चालणार नाही, असे म्हणत छावणी येथील होलीक्रॉस इंग्रजी माध्यमातील शाळेत विद्यार्थिनींना लेगिंगला मज्जाव केला. या वक्तव्यावरून सोमवारी शाळेत एकच गोंधळ उडाला. ही बाब कळताच पालकांनी थेट प्राचार्यांच्या कार्यालयात सर्व प्रकारावर नाराजी व्यक्त केली. माध्यमांचे प्रतिनिधी आले असता शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली.

छावणी परिसरात असलेली होलीक्रॉस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. यात काही प्रमाणात मुस्लिम समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनीदेखील आहेत. शाळेने ठरवून दिलेला युनिफॉर्म विद्यार्थ्यांनी घालायला हवा. परंतु विद्यार्थिनी स्कर्टस खाली लेगिंग घातलेल्या होत्या. पण शिक्षिकांनी त्याला मज्जाव घातला आहे. या विरोधात विद्यार्थिनींनी आवाज उठवला. सक्ती करणारा प्रकार आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणारा आहे. आम्हाला असे आवडत नाही. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया काही विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या, तर आमच्या मुलींवर अशी सक्ती लादता येणार नाही. कोणत्याही शाळांमध्ये असे नियम नाहीत. युनिफॉर्म आमची मुले घालतात. त्यासोबत विद्यार्थिनींनी मग काय कमी कपडे घालून शाळेत यायचे का असा सवाल करत प्राचार्यां सिस्टर जेनिफर यांना पालकांनी घेराव घातला. तसेच विद्यार्थिनींवर अशी सक्ती होत असल्याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे. यापूर्वीदेखील असेच प्रकार दोन तीन वेळा झाले आहेत. पालकांशी योग्यप्रकारे व्यवहारदेखील इथे होत नाही असा आरोपही काही पालकांनी केला. व्यवस्थापनाच्या वतीने तुम्ही इथे का आलात, प्रसार माध्यमांना इथे कोणी बाेलावले अशा अरेरावीची भाषाही वापरण्यात आली. दीड तास चाललेल्या या गोंधळात पालक आणि प्राचार्यांमध्ये नेमका तोडगा निघू शकला नाही. आमच्या पाल्यांसोबत असा प्रकार पुन्हा होता कामा नये. पुन्हा असे झाल्यास शिक्षण विभागात दाद मागू असा इशारा पालकांनी दिला. या वेळी सय्यद अब्रार अली, डॉ.वसीम बियाबानी, रफत बेग,सबदार खान,नगरसेवक शेख हनीफ,मिर्झा रफत बेग, मोहंमद घोस, मुजीब सिद्दिकी आदींसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

- शाळेत गणवेश असावा आम्हालाही मान्य आहे. परंतु विद्यार्थिनीसोबत जो प्रकार झाला तो अयोग्य आहे. यापूर्वीही असेच प्रकार शाळेत झाले आहे. त्यासंबंधी वेळोवेळी पालकांनी तक्रार केली आहे. मिर्झारफत बेग, पालक

- आम्ही सक्ती केलेली नाही. नियम बदलणार नाही. चर्चा करून काय तो निर्णय घेऊ. सिस्टरजेनिफर, प्राचार्या

- सकाळी विद्यार्थिनींना लेगिंग का घातली ती वर करा असे सांगण्यात आले. झालेला सर्व प्रकार विद्यार्थिनींनी घरी कळवला. यामुळे आम्ही सर्व पालक शाळेत आलो. हा सर्व प्रकार योग्य नाही. कोणालाही अशी सक्ती करता येत नाही. शिवाय पालकांशी बोलण्याची पद्धतही इथे नाही. मुलांना अशी सक्ती शाळेने करू नये. सय्यदअब्रार अली, पालक

- या शाळेसंबंधी दरवर्षी तक्रारी येतात. त्या शिक्षणाधिका-यांनाच काय कोणत्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. झालेला प्रकार वाईट असून पालकांनी लेखी तक्रार केल्यास आम्ही या संबंधितांवर कारवाई करू. नितीनउपासनी जि. प. शिक्षणाधिकारी