आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन गोंधळ: विद्यार्थ्यांना ऑनलाइन एक, एसएमएसवर दुसरेच कॉलेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर छत्रपती महाविद्यालयात चौकशी करणारे विद्यार्थी. - Divya Marathi
गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर छत्रपती महाविद्यालयात चौकशी करणारे विद्यार्थी.
औरंगाबाद- अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ कायम असून, आपल्याला कोणते कॉलेज मिळाले, या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत वाट पाहायला लावणारी पहिली गुणवत्ता यादी अखेर मंगळवारी जाहीर झाली. यादी जाहीर झाली असली तरी त्यातील तांत्रिक अडचणी कायम आहेत. कुणाला ऑनलाइन एक, तर एसएमएसवर वेगळेच कॉलेज मिळाले आहे. एवढेच नाही, तर संस्थास्तरावर करण्यात आलेल्या जागांच्या अलॉटमेंट यादीसाठी मंगळवारी १२.३० वाजेपर्यंत कॉलेजांनाही प्रतीक्षा करावी लागली. एवढेच करूनही पहिल्या दिवशी प्रवेश मिळूनही तो विद्यार्थ्यांना निश्चित करता आला नाही. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांचा प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम आहे.
 
यंदा प्रथमच औरंगाबादेत अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया झोन केंद्रांपासूनच वादात राहिली आहे. कधी विद्यार्थ्यांची पळवापळवी, तर कधी ऑनलाइन अडचणी या प्रवेश प्रक्रियेत अडथळा ठरल्या आहेत. मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत पहिल्या फेरीसाठी एकूण १९ हजार ७८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. उर्वरित.पान 

पहिल्या पसंतीक्रमाचा प्रवेश टाळला तर विद्यार्थ्याची शाखा होणार बाद 
विद्यार्थ्यांनीज्या कॉलेजला पहिला पसंतीक्रम दिला, त्याच कॉलेजमध्ये तो प्रवेशास पात्र ठरला आणि त्याने प्रवेश निश्चित केला नाही तर त्याची शाखा बाद होईल. दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरताना त्याला तीच शाखा घेता येणार नाही. नियमानुसार त्याला शाखा बदलावी लागेल. तरच तो विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज मिळाले तेथील प्रवेश टाळताना खबरदारी घ्यावी, असे सूत्रांनी सांगितले. 

तीन दिवसांत प्रवेश कसा? 
संकेतस्थळावरयेणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता तीन दिवसांत प्रवेश कसा पूर्ण होणार? शिवाय विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. याद्यांमध्ये नियमितता नाही. फीस रिसीप्ट अपडेट नाही. त्यामुळे अडचणी येत असल्याचे वसंतराव नाईक कॉलेजचे उपप्राचार्य सुभाष चव्हाण यांनी सांगितले. 

चांगले गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांची नावे पहिल्या यादीत का नाहीत? संस्थास्तरावर अलॉट झालेल्या ऑनलाइन आणि प्रत्यक्ष प्रिंट काढलेल्या यादीत फरक आहे. विद्यार्थ्यांनी जे पसंती क्रमांक कॉलेजसाठी दिले आहेत त्यांचा तर त्यानुसार नंबरच आला नाही. शिवाय पेमेंट रिसिटची प्रिंटच काढता येत नसल्याने आज जाहीर झालेल्या अलॉटमेंटनंतरही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करता आलेला नाही. ऑनलाइन यादीतील प्रक्रिया अपडेट होऊ शकलेली नाही, अशी माहिती विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासनाने दिली. 

प्राचार्यांनाही कळेनात गुणवत्तेचे निकष! 
पसंतीक्रमांकानुसार विद्यार्थी कॉलेजमध्ये आले. ९५% गुण असूनही यादीत नाव का नाही, अशी चौकशी करू लागले. शिक्षण विभागाने गुणवत्ता यादीत नाव येण्याचे निकष काय ठेवले, हेच समजले नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...