आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरवस्था: ड्रेनेजलाइनसाठी खोदला खड्डा; अंगुरीबागमध्ये वाहतूक कोंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गुलमंडी वॉर्डांतर्गत येणाऱ्या अंगुरीबाग परिसरातील हाजी कासीम मशीद रस्त्यावर गेल्या महिन्यापासून ड्रेनेजलाइनसाठी खड्डा खोदण्यात आला आहे. दिशा करिश्मा कॉम्प्लेक्समध्ये ड्रेनेजलाइन चोकअप झाल्यामुळे पाणी उलट्या दिशेने येत आहे. शिवाय खड्डा बुजवला नसल्याने वाहनचालकांची अडचण होत आहे.
चारशे ते पाचशे घरे असलेल्या या भागातील नागरिकांना ड्रेनेजलाइनमुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वीच येथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला होता. तो खोदून ठेवल्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तीनचाकी, कारला येण्या-जाण्यासाठी सोयीचा रस्ता राहिलेला नाही.
या रस्त्यावरच शनिमंदिर मशीद असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या कामाला गती देऊन तत्काळ ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण करावे तसेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी सय्यद मसूद, गुलाम अतीक, राम गुराळे, श्रावण जांगडे, प्रकाश घोरपडे, लक्ष्मण आडके, फारुख अली, सय्यद हसन आदी नागरिकांनी केली आहे.
खड्ड्यामुळे अडचण
चारशे-पाचशे घरे या भागात असल्यामुळे त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश वाहनचालक या रस्त्याने ये-जा करत असल्यामुळे या रस्त्यावर सातत्याने कोंडी होते. याबाबत महापालिकेला अनेकदा सांगितले. परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही. अडचण लवकर दूर करावी.
- सय्यद मसूद
- शनी अमावास्या असल्यामुळे भक्तांची मोठी गर्दी असते. शिवाय ड्रेनेजलाइनमुळे दुर्गंधी पसरली आहे. या ड्रेनेजलाइनचे काम तत्काळ होणे आवश्यक आहे. आतापर्यंत चारवेळा येथे खड्डा खोदला. परंतु तो बुजवण्याचे काम करण्यात आलेले नाही. या दिरंगाईचा फटका नागरिकांना बसतो.
श्रावण जांगडे.
लग्नामुळे काम थांबले
येथील गल्लीमध्ये लग्न सोहळा असल्याने आठ फूट खोल ड्रेनेजलाइनचे काम झालेले नाही. यासंदर्भात लवकर निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली जाणार आहे.''
पी.जी.पवार, वॉर्ड अभियंता.लग्नामुळे काम थांबले
येथील गल्लीमध्ये लग्न सोहळा असल्याने आठ फूट खोल ड्रेनेजलाइनचे काम झालेले नाही. यासंदर्भात लवकर निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली जाणार आहे.''
पी.जी.पवार, वॉर्ड अभियंता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा नागरिकांच्या प्रतिक्रिया...