आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And Bjp News In Marathi, Aurangabad, Ashok Chavan, Pasha Patel

कॉंग्रेसचे अशोकराव, शेख, तर भाजपचे पाशा पटेल स्टार प्रचारक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशपातळीवरील राष्ट्रीय पक्षांनी राज्य तसेच केंद्रीय पातळीवरील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यात मराठवाड्यातून तिघांचा समावेश आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असणार हे नक्की होते. या यादीत काँग्रेसकडून आमदार एम. एम. शेख, तर भाजपकडून पाशा पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठवाड्यातील अन्य नेत्यांना यात स्थान मिळू शकलेले नाही. गोपीनाथ मुंडे हे राष्ट्रीय स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.


निवडणूक खर्चाच्या ताळमेळासाठी आयोगाला स्टार प्रचारकांची यादी द्यावी लागते. स्टार प्रचारकाच्या येण्या-जाण्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात मोजला जात नाही. त्यामुळे प्रचार सुरू होताच त्यांची नावे आयोगाला द्यावी लागतात, अन्यथा मोठय़ा नेत्याचा खर्चही उमेदवाराच्या माथी लागतो. त्यामुळे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील स्टार प्रचारक नेत्यांची यादी आयोगाकडे सादर केली आहे. त्यात मराठवाड्यातून राज्य पातळीवरील स्टार प्रचारक म्हणून वरील तिघांची नावे आहेत.


पक्षश्रेष्ठींशी थेट संपर्क
स्टार प्रचारकाला पक्षात सर्वाधिक महत्त्व असते. उमेदवाराच्या विश्वासातील काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत असतात. ते त्यांना प्रचार यंत्रणेची संपूर्ण माहिती देतात. शिवाय मतदारसंघात कोणत्या प्रकारची व्यूहरचना करावी, विरोधकांची बलस्थाने ओळखून त्यावर कशा पद्धतीने आणि किती ताकदीने वार करावा, याचीही आखणी प्रचारकाकडून केली जाते. बर्‍याच वेळा विरोधी गोटातील महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांना फोडण्याचे कामही प्रचारक करत असतात. पक्षश्रेष्ठींशी थेट संपर्क साधून माहिती पोहचविण्याचे कामही स्टार प्रचारक करत असतात.

पक्षांच्या स्टार प्रचारकांची संख्या
काँग्रेस : 40, भाजप : 40, शिवसेना :38, आम आदमी पार्टी: 29, राष्ट्रवादी : 37, माकप : 24, मनसे : 28, सपा :20.