आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Core Committee Meeting N Today At Aurangabad

काँग्रेस कोअरच्या कमिटीची आज बैठक; माणकिराव ठाकरे, अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी शुक्रवारी रात्री काँग्रेस कोअर कमिटीची बैठक होत आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष माणकिराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहील. राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबरोबरच एमआयएमला कसे सामोरे जायचे यावर नियोजन होणार आहे. वाॅर्डनिहाय उमेदवारांची चाचपणी करणे, सर्वेक्षण करणे, संभाव्य उमेदवारांची यादी तयार करणे आदी बाबींवरही येथे चर्चा अपेक्षित आहे.

बैठक नितीन पाटील यांच्या निवासस्थानी होईल. राजेंद्र दर्डा, एम. एम. शेख, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील विलास औताडे, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे शहराध्यक्ष सय्यद अक्रम आणि जिल्ह्यातील आमदार या नात्याने अब्दुल सत्तार सुभाष झांबड यांचा या कोअर कमिटीत समावेश आहे.