आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता काँग्रेसमध्येही शहर कार्याध्यक्षाचे पद? राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद शहरातील मुस्लिम समाजाच्या संख्येचा विचार करता गेल्या अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद कायम याच समाजाकडे हेतूपुरस्सर देण्यात आले. शहराध्यक्ष मुस्लिम समाजाचा असल्याने जिल्हाध्यक्षपद बहुजन समाजाकडे देणे या पक्षाला सोपे होते.
मात्र आता जिल्हाध्यक्षपदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने जातीय समीकरणाचा ताळमेळ घालण्यासाठी शहर जिल्हा कार्याध्यक्ष हे पद नियुक्त करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी खासगीत बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रयोग गेल्या तीन वर्षांपूर्वीच सुरू केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी कमी करणे त्यांना सोपे गेले. त्यानंतर पुढेही त्यांनी ही पद्धत कायम ठेवली. त्याच मित्रपक्षाचा फॉर्म्युला या वेळी काँग्रेसकडून औरंगाबाद शहर जिल्ह्यात राबवला जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद गेले तर मोठा गट नाराज असेल. तेव्हा नाराज गटाला कार्याध्यक्षपद दिले जाईल. तसाच प्रकार शहरातही केला जाणार आहे. म्हणजे एका समाजाचा शहराध्यक्ष झाला तर दुसऱ्या समाजाला शहर कार्याध्यक्ष पद दिले जाईल. अर्थात हा फॉर्म्युला सत्तार जिल्हाध्यक्ष झाल्यानंतरच अमलात आणला जाईल अन्यथा पूर्वीचेच समीकरण म्हणजेच जिल्हाध्यक्षपद बहुजन समाजाकडे शहराध्यक्षपद मुस्लिम समाजाकडे असेच राहील, असेही सांगण्यात आले आहे. मात्र एमआयएम या पक्षाची शहरातील वाढती ताकद लक्षात घेता शहर कार्याध्यक्ष अशी दोन पदे ठेवण्याचा फॉर्म्युला चांगला असल्याचे पक्षातील काहींचे म्हणणे आहे. जिल्हा शहराची धुरा सोपवतानाच या नवीन पदांचे काय होणार हे स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीनेकाय केले?
तीनवर्षांपूर्वी शहराध्यक्षपदी मुश्ताक अहेमद यांची नियुक्ती केली तर कार्याध्यक्ष म्हणून विनोद पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी शहराध्यक्षपदी काशीनाथ कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हा ख्वाजा शरफोद्दीन यांच्याकडे शहर कार्याध्यक्षपद देण्यात आले. एका समाजाला पद दिले म्हणून दुसरा समाज नाराज होऊ नये वा दुरावू नये, अशी त्यामागची भूमिका होती. तालुका पातळीवरही राष्ट्रवादीने हाच प्रयोग केला. काँग्रेसकडूनही तसेच केले जाण्याचे संकेत आहेत.

सोयीसाठी पदनिर्मिती होऊ शकते
काँग्रेसच्याघटनेतकार्याध्यक्षपदाची तरतूद नाही, परंतु ते सोयीसाठी केले जाऊ शकते. जिल्हा किंवा शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. आ. अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्षपदाचेस्पर्धक.

श्रेष्ठींना प्रस्ताव अमान्य?
दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक पातळीवर हा प्रस्ताव राज्यस्तरावरील नेत्यांनी अमान्य केला होता, परंतु परिस्थितीनुसार योग्य वेळी ठरवू, असे सांगण्यात आल्याचे समजते.
बातम्या आणखी आहेत...