आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस महिला आघाडीचे बंड तूर्तास थंड, पण संघर्ष सुरूच...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या १८ महिला पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रदेशाध्यक्ष कमला व्यवहारे, प्रदेश सरचिटणीस अॅड. जयश्री शेळके यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर यांची नाराजी तूर्तास दूर झाली असली, तरी पक्षात दलाली करणाऱ्यांच्या विरोधात आपण यापुढे आवाज उठवत राहू, असा इशारा शहराध्यक्ष डॉ. विमल मापारी यांनी दिला आहे.

नाराज असलेल्या मापारी त्यांच्या सहकारी बुधवारी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा शहरात असतानाही त्यांच्या कार्यक्रमाला आल्या नव्हत्या. पक्षात काम करणाऱ्या महिलांऐवजी ऐनवेळी पदाधिकाऱ्यांच्या पत्नी, नातेवाईक तसेच आयात उमेदवारांना उमेदवारांच्या यादीत स्थान मिळाल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे दोन दिवस महिला पदाधिकारी आरोप करत होत्या.


राष्ट्रीय अध्यक्षा तसेच प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठीही त्या आल्या नाहीत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष व्यवहारे तसेच सरचिटणीस अॅड. शेळके यांनी बुधवारी रात्री डॉ. मापारी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अन्याय झाला तो दूर केला जाईल, असे सांगितले.

त्यानंतर डॉ. मापारी त्यांच्या नाराज सहकाऱ्यांनी पक्षात काम करणार असल्याचे सांगितले. असे असले तरी पक्षात जी काही दलाली चालते, त्याच्या विरोधात आपण आवाज उठवत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळायला हवी. पुढील निवडणुकीत असे होऊ दिले जाणार नाही, यासाठी महिला संघटन आतापासूनच कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यथोचित सन्मान केला जाईल
डॉ.मापारी त्यांच्या सहकाऱ्यांवर अन्याय झाला, अशी त्यांची भावना होती. आम्ही त्यांची भेट घेतली. येत्या काळात असा अन्याय होणार नाही, असा विश्वास त्यांना दिला. आमच्या आघाडीत बंड वगैरे काहीही नाही. त्या पक्षाचे काम करताहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. अॅड.जयश्री शेळके, प्रदेशसरचिटणीस.

आवाज उठवत राहू
आम्हीगाफील होतो. ऐनवेळी आमच्या सहकाऱ्यांची तिकिटे कापली गेली. पक्षात काय चालते हे आता कळले. पुढील वेळी असे होऊ नये म्हणून महिला संघटन आतापासूनच कामाला लागेल. पक्षात दलाली करणाऱ्यांविरोधात आम्ही आवाज उठवत राहू.
डॉ.विमल मापारी, शहराध्यक्षा, काँग्रेस महिला आघाडी
फोटो - डॉ.विमल मापारी,