आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षनेता आणि गटनेता वेगवेगळाच?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विरोधी पक्षनेता हाच विरोधी पक्षाचा गटनेता असतो; परंतु एकाच वेळी दोन नगरसेवकांना पदे देता यावी म्हणून विरोधी पक्षनेता वेगळा काँग्रेससोबत आलेल्या घटकपक्षांसह स्थापन झालेल्या गटाचा नेता वेगळा अशी दोन पदे निर्माण करण्याच्या हालचाली काँग्रेसने चालवल्या आहेत. काँग्रेस नगरसेवकांची गुरुवारी सुभेदारी विश्रामगृहावर बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक अफसर खान यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यांच्या नावावर प्रदेशाध्यक्षच शिक्कामोर्तब करणार असून तेथेच काँग्रेसचा गटनेताही ठरणार आहे. आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांच्या उपस्थितीत काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. त्यानुसार येत्या दोन दिवसांत प्रदेश पातळीवरून दोन्हीही पदांवर कोण हे नक्की होणार असल्याचे सांगण्यात आले. मागील सभागृहातही विरोधी पक्षनेता आणि गटनेता अशी दोन वेगवेगळी पदे होती. ही दोन्हीही पदे काँग्रेसकडेच होती. या वेळीही तोच फॉर्म्युला वापरला जाणार आहे. ११३ सदस्यांच्या सभागृहात अवघे १० सदस्य या पक्षाचे असले तरी ते विरोधी पक्षनेतेपदावर दावा करताहेत. एमआयएम या पक्षाची राज्य निवडणूक आयोगाकडे नोंद नसल्याचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यावर अजून निर्णय झाला नसला तरी विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडेच असेल असे गृहीत धरून काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत.

गट नोंदणीसाठी राष्ट्रवादीसोबत बैठक
काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांचे १३ नगरसेवक एक अपक्ष असे मिळून १४ जणांचा गट स्थापन केला जाणार आहे. त्यातील वाटाघाटीसाठी येत्या दोन दिवसांत बैठक होणार असून गटात आल्यानंतर राष्ट्रवादीला काय वाटा द्यायचा हे त्यात ठरेल.
बातम्या आणखी आहेत...