आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चव्हाण, राणेंच्या उपस्थितीत आज काँग्रेसची महत्‍वपूर्ण बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते, पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक २१ सप्टेंबरला औरंगाबादेत होणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीहरी पॅव्हेलियन, इझी डे मॉलच्या जवळ, शहानूरवाडी रोड येथे ही बैठक होणार आहे.
त्यात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, निवडणूक समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे मार्गदर्शन करतील. औरंगाबादसह मराठवाड्यातील काँग्रेसच्या जागा लढवण्याची रणनीती, उमेदवारांची निवड तसेच राष्ट्रवादीकडून काही मतदारसंघांची होणारी मागणी आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. शिवाय आघाडी झाली नाही तर नेमकी कार्यकर्ते, उमेदवारांची काय तयारी आहे, याचीही चाचपणी केली जाणार आहे. बैठकीस सर्व प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी केले आहे.