आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Member Arrested While Accepting Black Money

आठ हजारांची खंडणी घेणारा काँग्रेस कार्यकर्ता गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुरक्षा कर्मचाºयांची सेवा देणा-याकंत्राटदाराला ब्लॅकमेल करून आठ हजारांची खंडणी घेणा-याकाँग्रेस कार्यकर्त्याला सिडको पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजता घडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इंडियन सिक्युरिटी फोर्स कडून सुरक्षा रक्षकांची सेवा घेतली आहे. मात्र, तेथील सुरक्षा रक्षक व्यवस्थित काम करत नाहीत, गणवेश घालत नाहीत, असे आरोप करत काँग्रेस कार्यकर्ता प्रमोद प्रधान (26, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) याने विद्यापीठाला पत्र देऊन सुरक्षा एजन्सीवर कारवाईची मागणी करतानाच एजन्सीचे मालक तथा नौदलाचे निवृत्त अधिकारी लेखराजसिंग नेहालसिंग (रा. 65, परितोशनगर) यांच्याकडे 25 हजार रुपये खंडणीची मागणी केली. मात्र, लेखराज यांनी त्याला दीड हजार रुपये दिले. त्यानंतर 13 आणि 27 जून रोजी प्रमोदने लेखराज यांना फोन करून पैशांची मागणी केली.
प्रमोद गुरुवारी सकाळी दहा वाजता लेखराज यांच्या कार्यालयात पोहोचला. लेखराज यांच्या मुलाने लेखराज यांना फोनवरून माहिती दिली. लेखराज यांनी सिडको पोलिसांना घेऊनच कार्यालय गाठले. प्रमोद कार्यालयात बसलेला होता. लेखराज यांनी प्रमोदला आठ हजार रुपये दिले. तेव्हा कार्यालयाबाहेर उभ्या पोलिसांनी प्रमोदला रंगेहाथ पकडले.

सीसीटीव्हीमुळे पुरावे भक्कम
प्रमोद प्रधान हा खंडणीसाठी कार्यालयात गेला. त्यानंतर खंडणी घेतानाचे फुटेज आणि दोन दिवसांपूर्वी हप्ता आणि खंडणीसाठी लेखराज यांच्याशी अकरा मिनिटांचे संभाषणही लेखराज यांनी रेकॉर्ड केले.

कोण आहे प्रमोद प्रधान?
प्रमोद हा कारचालक असून तो काँग्रेसच्या राज्य योजना नियोजन समितीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. त्याच्याकडे तसे व्हिजिटिंग कार्ड असून त्यावर वेगवेगळ्या पदांचा उल्लेख आहे. प्रमोदवर तीन ते चार वर्षांपूर्वी छावणी पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सुशीलकुमार शिंदे मित्रमंडळाचा तो अध्यक्ष आहे.