Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Congress MLA Abdul Sattar In Statue Shoes, Sandals Beating On BJP

औरंगाबाद: काँग्रेस आमदार अब्दूल सत्तार यांना जोडे मारो आंदोलन

दिव्य मराठी वेब टीम | Jun 16, 2017, 09:10 AM IST

औरंगाबाद: शेतकऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी बजरंग चौक येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. शेतकऱ्यास मारहाण करताना हिंदू देव दैवतांचा उल्लेख करून शिवीगाळ केल्याचाही निषेध करण्यात आला. महापौर भगवान घडामोडे, माजी नगरसेवक अनिल मकरिये, दिलीप थोरात, नगरसेवक शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, मंगलमूर्ती शास्त्री, प्रशांत देसरडा, संजय बोराडे, मनीषा भन्साळी, डॉ. सुनीता सोळुंके, उषा काळे, स्वाती कुलकर्णी, गीता कापुरे, छाया सोनवणे, चंपावती झुंजारकर, दीगंबर खरात, राजु वाडेकर, सतीश खेडकर, शिवाजी शिरसे, मोदी काका, रोहन परदेशी, प्रदीप ठाकरे, अभय रगडे, शाम बांगड, रामचंद्र जाधव, विशाल खंडागळे, सुभाष लोखंडे, जनार्दन अमृतकर, श्रीनिवास कुलकर्णी, अमेय देशमुख आदींची उपस्थिती होती.
हे ही वाचा,

Next Article

Recommended