आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनात काँग्रेसची उडी, पाठिंब्यावरून हमरीतुमरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थकीत रकमेसाठी, तर निवृत्त कर्मचाऱ्यांनी थकीत उपदानाच्या मागणीसाठी गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना प्रशासन अडचणीत सापडले आहे. याचाच फायदा घेत काँग्रेसने आज आंदोलनात उडी घेतली.
भाजपच्या ताब्यातील सिद्धेश्वर अडचणीत सापडल्याची संधी साधून आज पहिल्यांदाच काँग्रेसने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायंकाळी अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात काही पेन्शनधारक कारखाना कार्यालयात आले असता त्यांनी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यास अब्दुल समीर यांनी दुजोरा दिला.