आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Nationalist Make Alliance In Aurangabad City

एमआयएम, मोदी लाटेमुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादीची औरंगाबाद शहरात आघाडी होण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराच्या राजकारणात एमआयएमने केलेले जोरदार आगमन आणि मोदी लाटेच्या पार्श्वभूमीवर होणा-या महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याची तयारी चालवली आहे. बोलणी लवकरच सुरू होणार असली तरी फिफ्टी-50 जागा वाटून घ्याव्यात, असे प्राथमिक चर्चेत ठरल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत शहरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले. तीनपैकी एकाही मतदारसंघात त्यांचा उमेदवार दुस-या क्रमांकावरही राहू शकला नाही. त्यातल्या त्यात काँग्रेसची अवस्था काहीशी चांगली होती. राष्ट्रवादी तर तिसरा क्रमांकही टिकवू शकली नाही. एका मतदारसंघात हा पक्ष तिस-या क्रमांकावर राहिला. हे दोन्हीही पक्ष एकाही मतदारसंघात आघाडी मिळवू शकले नाहीत. त्यामुळे पालिकेत आपले काही खरे नाही, अशीच स्थानिक नेत्यांची धारणा आहे. त्यामुळे इभ्रत टिकवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे दोन्हीही बाजूंकडून सांगण्यात येते.

या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीत वेगवेगळे लढलो तर गतवेळइतक्या जागाही मिळणार नाहीत, याची जाणीव स्थानिक नेत्यांना झाली असून एकत्र लढून आपले नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे ठरले आहे.

मित्रपक्षांना आपापल्या कोट्यातून जागा देण्यावर दोन्ही पक्ष सहमत
युती तसेच एमआयएमला रोखण्यासाठी एकत्र लढण्याबरोबरच मित्रपक्षांनाही सोबत घेण्याची गरज दोन्हीही पक्षांनी मान्य केली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष तसेच अन्य पक्षांना सोबत घ्यावे आणि त्यांना काही जागा द्याव्यात, असा मतप्रवाह आहे.

वॉर्ड रचनेनंतर प्रत्यक्ष बोलणी
वॉर्ड रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष बोलणी सुरू होणार असून त्यात निम्म्या जागा वाटून घेत लढण्याचा फॉर्म्युला ठेवला जाईल, असे दोन्ही पक्षांच्या सूत्रांनी सांगितले. १५ फेब्रुवारीनंतर बोलणीहोईल. तोपर्यंत काँग्रेसचे वॉर्डनिहाय सर्वेक्षण पूर्ण होईल. राष्ट्रवादीही मुलाखतीचे सोपस्कार पूर्ण करेल.